Dr.Bhagwat Karad News: कारवाई कसली ? अशोक चव्हाण समर्थक काँग्रेस आमदार भाजपमध्ये येणार..

Legislative Council Election Bhagwat Karad on Congress MLA Cross Voting: राज्यात पुन्हा मोठे भूकंप होतील, मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगत भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील मोठ्या घडामोडी घडणार असल्याचा दावा केला.
Bhagwat Karad
Bhagwat KaradSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar: विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांवर कारवाई कसली करता? ते भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी केला. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सात आमदार फुटल्याचे समोर आल्यानंतर या गद्दार आमदारांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी अन्य आमदारांकडून करण्यात आली.

क्रॉस व्होटिंग करून पक्षादेश डावलणाऱ्या या आमदारांमध्ये नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण समर्थक काँग्रेस आमदार रडारवर आहेत. या संदर्भात डॉ. भागवत कराड यांना विचारले असता, हे सगळे आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी `सरकारनामा`शी बोलताना केला.

विधानसभेच्या निवडणुकीआधी राज्यात पुन्हा मोठे भूकंप होतील, मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगत त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील मोठ्या घडामोडी घडणार असल्याचा दावा केला. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षादेश डावलून महायुतीच्या पारड्यात आपले मत टाकल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

Bhagwat Karad
Parliament Budget Session 2024 Live Updates: अर्थसंकल्पात 'या’ 9 क्षेत्रांवर मोदी सरकारचा सर्वाधिक भर

या सगळ्यांवर कारवाई करीत मोठा दणका देण्याच्या तयारीत काँग्रेसचे नेतृत्व असल्याची चर्चा आहे. अशावेळी भाजपच्या माजी मंत्र्याने काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी नांदेड जिल्ह्यातील आमदारांचा थेट उल्लेख केल्यामुळे अशोक चव्हाण समर्थक आमदार मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर संशयाच्या घेऱ्यात होते.

त्यातच अंतापूरकर यांनी अशोक चव्हाण यांची नुकतीच भेट घेतली. आता भाजपच्या मराठवाड्यातील नेत्याने अशोक चव्हाण समर्थक नांदेड जिल्ह्यातील आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मराठवाड्यात येत्या काही दिवसात पुन्हा एकदा प्रवेश सोहळे सुरू होण्याची शक्यता आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com