`मन की बात`, ऐकत चंद्रकांत पाटलांनी पक्ष निधी म्हणून १ हजार रुपयेही दिले..

मी स्वतः १ हजार रुपये पक्ष निधी देत याची सुरूवात केली आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष निधीसाठी नमो अॅपच्या माध्यमातून योगदान द्यावे. (Chandrakant Patil,Bjp)
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : भाजपच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता राज्यातील १९ हजारांहून अधिक शक्ती केंद्रातून मन की बात हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) कार्यक्रम ऐकवण्यात आला. (Bjp) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर राज्यातील १९ हजार शक्ती केंद्रात प्रत्येकी पाच बुथमध्ये ५०-१०० नागरिकांना एकत्रित करून मन की बात (Chandrakant Patil) ऐकण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले होते.

याचवेळी भारतीय जनता पक्षासाठी निधी उभारण्याचे आवाहन देखील करण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नमो अॅपच्या माध्यमातून १ हजार रुपये पक्ष निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या सात वर्षापासून सातत्याने देशातील जनतेशी मन की बातच्या माध्यमातून संवाद साधत असतात. देशात आणि विदेशात भावलेल्या गोष्टी आणि नवनवीन संकल्पना पंतप्रधान मांडत असतात.

राज्यातील प्रत्येक नागरिकाने मन की बात कार्यक्रम पहावा, ऐकावा असा प्रयत्न भाजपच्या वतीने केला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी राज्यातील १९ हजार शक्ती केंद्रांमध्ये मन की बात एकाचवेळी ऐकण्याचा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते. मी स्वतः कोल्हापूरातील भाबेवाडी गावातून मी या उपक्रमाला सुरूवात केली आहे.

Chandrakant Patil
महापालिका निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी ; औरंगाबादेत लागले बॅनर

येत्या मार्चपर्यंत हा कार्यक्रम २५ हजाराहून अधिक शक्ती केंद्रात राबवण्याचा आमचा मानस असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले. या शिवाय भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात हा पक्ष आपला आहे आणि आपण तो चालवतो ही भावना निर्माण व्हावी, यासाठी पक्ष निधी म्हणून पाच ते हजार रुपये नमो अॅपच्या माध्यमातून जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

मी स्वतः १ हजार रुपये पक्ष निधी देत याची सुरूवात केली आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष निधीसाठी नमो अॅपच्या माध्यमातून योगदान द्यावे, अॅपमध्ये काही अडचण आली तर आपापल्या जिल्ह्यातील संघटन, सरचिटणीसांकडे निधी जमा करावा, नमो अॅपवरून तो निधी पक्षाकडे जमा केला जाईल आणि त्याचे स्क्रीनशाॅट प्रत्येकाला पाठवले जातील असेही पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com