Nanded Politics: लोहा-कंधारमध्ये रंगणार दाजी-भावजीमध्ये राजकीय कुस्ती?

Loha-Kandar Assembly Election Pratap Patil Chikhlikar vs MLA Shyamsunder Shinde:कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण लोहा कंधार विधानसभा निवडणुक लढवण्यास तयार असल्याचे संकेत भाजपचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले.
Pratap Patil Chikhlikar vs MLA Shyamsunder Shinde
Pratap Patil Chikhlikar vs MLA Shyamsunder ShindeSarkarnama

लोकसभेचा 'आखाडा'संपल्यानंतर आता सर्वाना वेध लागले आहेत ते विधानसभेच्या 'आखाड्याचे' इच्छुकांनी आत्तापासून पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. नांदेडमध्ये देखील विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वसंत चव्हाणांनी प्रताप पाटील चिखलीकर यांनी 'धोबीपछाड'देत पराभवाची धुळ चारली आहे. लोकसभेत पराभव झाल्यानंतरही चिखलीकरांनी (Pratap Patil Chikhlikar) विधानसभा लढवण्यासाठी बाह्या सरसावल्या आहेत.

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण लोहा कंधार विधानसभा निवडणुक लढवण्यास तयार असल्याचे संकेत भाजपचे नेते प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी दिले. पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण नक्की लोहा कंधार विधानसभा निवडणूक लढवू असे चिखलीकर यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील एकूण नऊ विधानसभा मतदार संघातील होणाऱ्या लढती पेक्षा लोहा कंधार मतदार संघात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला. आता पुन्हा चिखलीकर हे लोहा कंधार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. लोहा येथे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा नुकताच झाला.

Pratap Patil Chikhlikar vs MLA Shyamsunder Shinde
50th Anniversary Of Emergency:भाजपनं काँग्रेसला करुन दिली मनोज कुमार यांच्या 'शोर'ची आठवण

प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा कंधारमधून विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह या सवांद मेळाव्यात कार्यकर्त्यांनी धरला.कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण लोहा कंधार विधानसभा निवडणुक लढवण्यास तयार असल्याचे संकेत प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले. पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण नक्की लोहा कंधार विधानसभा निवडणूक लढवू असे चिखलीकर यांनी सांगितले.

लोहा कंधार मतदारसंघात आता दाजी प्रताप पाटील चिखलीकर आणि भावजी शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे (MLA Shyamsunder Shinde) यांच्यामध्ये सामना रंगणार असे चित्र आहे. आजची जी जनभावना लक्षात घेता पक्षश्रेष्ठी देखील मला विधानसभा निवडणुकीचे तिकीट देण्यासाठी नक्की विचार करेल अशी प्रतिक्रिया माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.

कंधार-लोहा मतदारसंघावर भाई केशवराव धोंडगे यांनी तब्बल २० वर्षे राज्य केले आहे. त्यानंतर हा मतदारसंघ चर्चेत विधानसभेत प्रताप पाटील चिखलीकर यांनी गाजवला. याच मतदारसंघात अशोक चव्हाण-प्रताप पाटील यांच्यात पहिल्यांदा संघर्षाची ठिणगी पडली होती. लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा अद्यापही वरचष्मा आहे.

खासदार प्रताप पाटील यांच्या ज्येष्ठ भगिनी या आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आहेत. श्यामसुंदर शिंदे हे सनदी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी श्यामसुंदर शिंदे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यावेळी प्रताप पाटील यांचे पुत्र प्रवीण हे देखील इच्छुक होते. मात्र बहिणीच्या हट्टापुढे खासदार प्रताप पाटील यांनी शरणागती पत्करली आणि मेहुण्याच्या निवडणुकीचा प्रचार केला होता. श्यामसुंदर शिंदे दणदणीत मताने विजयी देखील झाले होते. आगामी विधानसभेत शिंदे-चिखलीकर आमने सामने आले तर दाजी-भावजी यांच्यातील राजकीय कुस्तीकडे सगळ्याचे लक्ष असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com