Sambhajinagar Lok Sabha Constituency : काठावर पास झालेले आमदार सावे, जयस्वाल लोकसभेला मताधिक्य कसे मिळवून देणार?

Sanjay Shirsat On Sandipan Bhumare : शिरसाट विधानसभेला हॅट्ट्रिक साधली होती. आता लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या भुमरेंना ते किती मताधिक्य मिळवून देतात? हे पाहावं लागणार आहे.
pradeep jaiswal sandipan bhumare atul save
pradeep jaiswal sandipan bhumare atul save sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News, 26 May : देशातील लोकसभा निवडणूक ( lok Sabha Election 2024 ) ही पुढच्या सहा महिन्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून राज्यातील जनेतचा मुडही लक्षात येणार आहे. त्यामुळे बहुतांश राजकीय पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीसोबतच विधानसभेची तयारी सुरू केली होती. त्यामुळे लोकसभा निकाल चार जूनला लागल्यानंतर प्रत्येकाला आपली पत कळणार आहे.

लोकसभेच्या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांची खरी कसोटी या निमित्ताने लागणार आहे. लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारंसघाचे उमेदवार संदीपान भुमरे ( Sandipan Bhumare ) यांना कोणत्या विधानसभा मतदारसंघातून किती मताधिक्य किंवा मतं मिळतात? यावर महायुतीतील वरिष्ठ नेते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस-पवार यांनी आपापल्या आमदारांना जोरात काम करा, विधानसभेची उमेदवारी देताना तुमच्या मतदारसंघातील कामगिरीचा विचार केला जाईल, अशा सूचक इशारा दिलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर संभाजीनगर लोकसभे अंतर्गत येणाऱ्या शहरातील पुर्व-पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघाचा विचार केला, तर संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) सोडता अतुल सावे, प्रदीप जयस्वाल हे दोघे स्वतः 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काठावर पास झाले होते. शिवसेना-भाजप युती असताना त्यांना विरोधकांनी फेस आणला होता. आता हे आमदार लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळवून देणार हा खरा प्रश्न आहे?

गेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या मताधिक्यावर नजर टाकली तर पश्चिम मतदारंसघातून शिवसेनेचे संजय शिरसाट हे अपक्ष राजू शिंदे यांचा 40445 मतांनी पराभव करून निवडून आले होते. एमआयएम-अपक्ष आणि शिवसेना अशी तिरंगी लढत या मतदारसंघात झाली होती. तर शिरसाट यांनी चांगले मताधिक्य मिळवत हॅट्ट्रिक साधली होती. आता लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या भुमरेंना ते किती मताधिक्य मिळवून देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे पुर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे ( Atul Save ) हे स्वतः गेल्या विधानसभा निवडणुकीत काठावर पास झाले होते. 'एमआयएम'च्या डॉ. गफ्फार कादरी यांनी त्यांना 'काँटे की टक्कर' दिली होती. या निवडणुकीत सावे यांना अवघ्या 13930 मतांनी विजय मिळवता आला होता. युतीमध्ये असताना सावे यांना विजयासाठी झगडावे लागले होते. आता त्यांच्या मंत्रिपदाचा किती फायदा लोकसभेचे उमेदवार संदीपान भुमरे यांना होतो याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जयस्वाल लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात फारसे सक्रीय नव्हते, अशी चर्चा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जयस्वाल यांची लढत 'एमआयएम'चे नासीर सिद्दीकी यांच्याशी होती. 13892 मतांनी ते विजयी झाले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शहरी भागात मुस्लिम मतांचा टक्का वाढल्याचा दावा केला जातोय. अशावेळी शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात दोन शिवसेना आणि एक भाजपचा आमदार, मंत्री असतांना महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळणे अपेक्षित आहे. यावरच मंत्री आणि आमदारांच्या कामगिरीचे मुल्यमापन वरिष्ठांकडून केले जाणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com