Lok Sabha Election 2024 : नांदेडवर 'फतेह' मिळवण्यासाठी MIM चे 'जो बोले सो निहाल...'

Lok Sabha Election 2024 : खासदार इम्तियाज जलील यांचे सोशल इंजिनिअरिंग...
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : जातीयवादी पक्ष म्हणून एमआयएम अर्थात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाला राजकीय जाणकार आणि विरोधकांकडून नेहमी हिणवले जाते. मात्र, आता एमआयएमने सोशल इंजिनिअरिंग सुरू केले आहे. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, हे पटवून देण्यासाठी एमआयएमचे माजी खासदार तथा राज्याचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सर्वधर्मीयांच्या प्रार्थना स्थळांना भेटी देण्याचा धडका लावला आहे. (Latets Marathi News)

इम्तियाज जलील हे स्वतः छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा मैदानात असणार आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातूनही एमआयएम उमेदवार देणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी इम्तियाज यांनी जाहीर केले होते. त्यानंतर काल ते स्वतः नांदेडमध्ये दाखल झाले आणि त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत चाचपणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Raj Thackeray News : मोदी-शाहांना हाकलून देण्याची भाषा करणारे राज ठाकरे शाहांच्या घराची पायरी चढणार?

संघटनात्मक आढावा घेतानाच इम्तियाज जलील यांनी नांदेडातील प्रसिद्ध गुरुद्वाराला भेट देत दर्शन घेतले. सोशल मीडियावर या भेटीची छायाचित्र झळकताच नांदेड फेतह करण्यासाठी एमआयएमने जो बोले सो निहाल चा नारा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमची वंचित बहुजन आघाडीसोबत युती होती. नांदेडमध्ये या युतीचे प्रा. यशपाल भिंगे काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरोधात लढले होते.

Lok Sabha Election 2024
Pune NCP Ajit Pawar : लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाची नाराजी दूर; शिंदे सरकारनं उचललं मोठं पाऊल

त्यांना विजय मिळवता आला नव्हता, पण त्यांना मिळालेल्या 1 लाख 66 हजार मतामुळे अशोक चव्हाण यांच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास मात्र हिरावला गेला होता. आता तेच अशोक चव्हाण भाजपमध्ये आहेत, तर वंचितने एमआयएमसोबतची युती तोडली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमने स्वबळावर राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. यात मराठवाड्यातील संभाजीनगर आणि नांदेड मतदारसंघाचा समावेश आहे. पैकी संभाजीनगरातून स्वतः इम्तियाज जलील उमेदवार असणार आहे, तर नांदेडमध्ये (Nanded) उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.

अशावेळी आपल्या नांदेड दौऱ्यात इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी नांदेडच्या पवित्र गुरुद्वारात जाऊन दर्शन घेत सर्वधर्म समभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या तोंडावर त्यांची गुरुद्वाराला दिलेली भेट आणि गुरुगोविंदसिंहाचे घेतलेले दर्शन याकडे राजकीय दृष्टीने पाहिले जाणार आहे. इम्तियाज जलील यांच्या गुरुद्वारा भेटीचा हेतू किती शुद्ध होता, हे लवकरच स्पष्ट होईलच. पण नांदेडमधून लोकसभा लढवण्याची घोषणा केल्यानंतर इम्तियाज यांनी दिलेल्या ` जो बोले सो निहाल सत श्री अकाल ` ची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com