Loksabha Election 2024 : मुंबईतून निवडणूक लढणार ही जलील यांनी सोडलेली पुडीच; असा निर्णय न झाल्याची ओवेसींची माहिती

Imtiaz Jaleel : विरोधकांचा अंदाज घेण्यासाठी इम्तियाज जलील यांची चर्चा घडवून आणल्याची कुजबूज
Imtiaz Jaleel, Asaduddin Owaisi
Imtiaz Jaleel, Asaduddin Owaisi Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar News :

AIMIM चे खासदार आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील हे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी खुद्द इम्तियाज जलील यांनी दिली होती. मुंबईच्या मीरा भाईदर भागात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वाहन रॅलीत राडा केल्यामुळे काही दिवसांनी या भागातील मुस्लिमांची अतिक्रमणे आणि घरांवर महापालिकेने बुलडोझर फिरवला होता. या पार्श्वभूमीवर जलील बोलले होते.

या कारवाईच्या वेळी मुंबईतील कुठलाही राजकीय पक्ष जो स्वतःला मुस्लिम अल्पसंख्याकांचा मसीहा म्हणवून घेतो तो फिरकला नाही. त्यावेळी अनेकांनी खासदार इम्तियाज जलील, असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना फोन करून मदतीसाठी या, अशी साद घातली होती. या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर या मुंबईतील मुस्लिमबहुल भागात नशीब आजमावण्यासाठी इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी 'चलो मुंबई'चा नारा दिला होता.

दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात आलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनीही पत्रकारांना या घटनेचा उल्लेख करत आम्ही तिथे मुस्लिमांच्या मदतीला जाणार असे सांगितले. त्याचेळी इम्तियाज जलील औरंगाबादमधून (Aurangabad Loksabha Constituency) लढणार की मुंबईतून याचा निर्णय आम्ही अद्याप घेतलेला नाही, असे सांगत एक प्रकारे इम्तियाज जलील हे औरंगाबादेतूनच लढतील, असे संकेत दिले.

त्याचवेळी इम्तियाज जलील यांनी खासदार म्हणून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) किती चांगले काम केले, याचे ओवेसींनी प्रगती पुस्तकही मांडले. त्यामुळे इम्तियाज जलील हे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, ही फक्त विरोधकांच्या गोटात काय हालचाल होते याचा कानोसा घेण्यासाठी सोडलेली पुडी होती, हे आता स्पष्ट झाले आहे.

'इंडिया' आघाडीमध्ये समावेश करावा, आम्हाला भाजपची 'बी टीम' म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्याशी युती करावी, अशा पद्धतीची विधाने करत इम्तियाज जलील यांनी यापूर्वीही चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्यक्षात यातून काहीही साध्य झाले नाही. तशीच चर्चा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी ठरवून घडवून आणल्याचे दिसते, आपल्यासाठी सहानुभूती निर्माण व्हावी, असा एमआयएमचा प्रयत्न यातून दिसतो असेही बोलले जाते.

2019 मध्ये एमआयएमने पहिल्यांदा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यामुळे राज्यातील इतर कुठल्याही लोकसभा मतदारसंघापेक्षा एमआयएमला इथून लढणे अधिक सोपे आहे. त्यामुळे इम्तियाज जलील इतर कुठल्या मतदारसंघातून लढण्याची शक्यता अजिबातच नाही.

केवळ मुस्लिम व्हाेट बँकेच्या राजकारणातूनच इम्तियाज जलील, वारीस पठाण आणि त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा ओवेसी यांनी मुंबईमधील मीरा भाईंदरचा मुद्दा उचलून धरत आपणच मुस्लिम अल्पसंख्याकांसाठी लढतो, हे दाखवण्याचा या नेत्यांचा प्रयत्न होता, हे आता स्पष्ट झाले आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com