Chhatrapati Sambhajinagar Constituency : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात 2019ची पुनरावृत्ती होणार का?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशी रंगत वाढतांना दिसत आहे.
Chhatrapati Sambhajinagar Constituency
Chhatrapati Sambhajinagar ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Loksabha Election 2024 : महायुती-महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात 2019 ची पुनरावृत्ती घडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, एमआयएम, बीआरएस, अपक्ष अशी पंचरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशी रंगत वाढतांना दिसत आहे.

राज्यातील महायुती सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. याचे श्रेय मराठा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेना पक्षाला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे नाव चर्चेत आणले जात आहे. महायुतीमध्ये संभाजीनगरची जागा कोण लढवणार? हे अद्याप स्पष्ट नसले तरी येत्या 5 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शहरात होणाऱ्या जाहीर सभेमुळे भाजपाच ही जागा लढवणार याचे संकेत मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhatrapati Sambhajinagar Constituency
Lok Sabha Election 2024 : 'वंचित' एकटी लढली तर भाजपविरुद्ध अटीतटीचा सामना होणार

दुसरीकडे शिवसेनेचा या जागेवरचा दावा कायम असून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा उमेदवार देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी चालवली असल्याचे बोलले जाते. विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा यातूनच समोर येतांना दिसते आहे. पण भाजपने जागा सोडली नाही, तर विनोद पाटील यांनी अपक्ष लढवण्याची तयारी चालवली आहे. तसे त्यांनी जाहीरपणे सांगूनही टाकले. मराठा आरक्षणाचा लढा गेल्या कित्येक वर्षापासून याचिकाकर्ते म्हणून लढत असल्यामुळे त्यांना समाजाचा मोठा पाठिंबा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

त्यांनी स्वतःच आपली उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळते? की मग अपक्ष म्हणून लढावे लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विनोद पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही आणि जर ते अपक्ष लढले तर मग संभाजीनगरात पुन्हा 2019 च्या निवडणुकीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. विनोद पाटील यांची ओळख मराठा आरक्षण याचिकाकर्ते अशी आहे. पुर्वी ते राष्ट्रवादीत होते, पण त्यांचा जनसंपर्क फारसा नसल्यामुळे त्यांना राजकारणात मोठे यश मिळवता आले नाही.

2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना तेव्हाच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण त्यांना केवळ 11 हजार 842 इतकीच मते मिळाली होती. झालेल्या एकूण मतदानांच्या सव्वा सहा टक्के एवढीही मते होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली होती, तरी ते चौथ्या क्रमांकावर होते. अर्थात तेव्हा राष्ट्रवादीचे नेते तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचे समर्थक अशीच त्यांची ओळख होती.

Chhatrapati Sambhajinagar Constituency
Nanded BJP News : अशोक चव्हाणांमुळे नांदेडची जागा सेफ झोनमध्ये; आघाडीला धडकी

आता दहा वर्षानंतर विनोद पाटील यांची राज्य पातळीवर मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायलायात लढा देणारे याचिकाकर्ते अशी ओळख निर्माण झाली आहे. या शिवाय गेल्या दोन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती थेट आग्रा येथील लाल किल्ल्यावर जाऊन साजरी करण्यामुळे ते चर्चेत आहेत. पाटील यांनी लोकसभा लढवण्याची घोषणा करत एकप्रकारे महायुतीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. जर विनोद पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली, तर हे एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या पथ्यावर पडू शकते.

Chhatrapati Sambhajinagar Constituency
MP Imtiaz Jaleel : 'एवढा मोठा नेता येणार, मग सभेसाठी मैदान तरी मोठे घ्यायचे ना ?' इम्तियाज जलील यांचा भाजपला टोला

वंचित बहुजन आघाडीसोबत नसल्याने बॅकफूटवर असलेली एमआयएम पुन्हा गेमचेंजरच्या भूमिकेत दिसू शकते. 2019 ची पुनरावृत्ती टाळायची असले तर ताकदीचा अपक्ष उमेदवार निवडणुक रिंगणात राहणार नाही, याची काळजी महायुती-महाविकास आघाडीला घ्यावी लागेल. वंचित बहुजन आघाडी अजूनही स्वतःला महाविकास आघाडीचा भाग म्हणवून घ्यायला तयार नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडेही लक्ष ठेवावे लागेल.

याशिवाय तेलंगणातील बीआरएस पक्षही संभाजीनगरमधून उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. कदीर मौलाना यांच्या नावावर पक्षात चर्चा सुरू आहे. मौलाना यांनीही राष्ट्रवादीकडूनच मध्य विधानसभा मतदारसंघातून निशीब आजमावलेले आहे. 2009 आणि 2019 अशा दोन निवडणुकीत मौलाना यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. त्यात अनुक्रमे 41 हजार 583 आणि 7290 मते मिळाली होती. आता ते थेट लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुहेरी लढत बहुरंगी अवस्थेत जाण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com