Ncp Youth Chief Mehboob
Ncp Youth Chief Mehboob Sarkarnama

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षांच्या गावातच पक्षाचे पानीपत

राष्ट्रवादीला केवळ चार जागा जिंकता आल्या. तर, भाजपने मात्र ११ जागा जिंकल्या. जिल्ह्यात केवळ दोन जागा शिवसेनेने जिंकल्या. ( Ncp Beed)
Published on

बीड : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या शिरुर कासार या गावच्या नगर पंचायतीत राष्ट्रवादीचे पानीपत झाले आहे. (Ncp) पक्षाला केवळ चार जागा जिंकता आल्या. भाजपने ११ जागांसह जोरदार विजय मिळविला. (Beed) पाच वर्षांपूर्वी झालेल्या नगर पंचायतींच्या निवडणुकीवेळी सुरेश धस (Mehboob Shaikh) राष्ट्रवादीत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली शिरुर कासारची नगर पंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती.

मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दरम्यान सुरेश धस यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यावेळी धसांचे कट्टर समर्थक असलेले महेबुब शेख राष्ट्रवादीतच थांबले. मात्र, धसांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्या समर्थक सर्व नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. धसांच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादीत थांबलेल्या महेबुब शेख यांना राष्ट्रवादीने युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद दिले.

मात्र, त्यांच्या पाठीशी गावच्या नगर पंचायतीमधील १७ पैकी केवळ एक नगरसेवक थांबला. आता झालेली नगर पंचायतीची निवडणुक शिरुर कासारमध्ये महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. शेख यांनी निवडणुकीसाठी मोठी ताकद लावली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार सुधीर लंके यांच्या सभाही या ठिकाणी झाल्या.

Ncp Youth Chief Mehboob
भाजपचे केंद्रातले दोन मंत्री आले, तरी शिवसेनेचा भगवा फडकवलाच

महेबुब शेख यांनी देवस्थान जमिनींचा मुद्दा अजेंड्यावर आणला. राजकिय गुरु सुरेश धस यांच्यावर त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. निकालात मात्र शिरुरकरांनी राज्यात वावर असलेल्या भूमिपुत्र महेबुब शेख यांच्या झोळीत फारच कमी टाकले. राष्ट्रवादीला केवळ चार जागा जिंकता आल्या. तर, भाजपने मात्र ११ जागा जिंकल्या. जिल्ह्यात केवळ दोन जागा शिवसेनेने शिरुर कासारमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com