Marathwada Political News : वर्षानुवर्षे एकाच राजकीय पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहून निमुटपणे पक्षकार्य करणाऱ्याची परवड सर्वच पक्षात होत असते. मात्र बाहेरून आलेल्यांना सत्ता आणि संघटनेतील महत्वाची पदे दिली जातात. (Parbhani News) परंतु केवळ पक्षाशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती वेगळा विचार करू देत नाही. परभणी जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षातही हेच चित्र बघायला मिळत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या व एकेकाळी अतिशय व्यापक जनाधार असलेला कॉंग्रेस (Congress) पक्षातून अनेकांचे राजकीय करियर घडले. परभणी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेतृत्व माजी मंत्री कै. स. गो. नखाते, कै. रावसाहेब जामकर यांनी केले. अॅड. गणेश दुधगावकर यांनी मंत्रीपद भूषवले. माजी खासदार रामराव लोणीकर यांनी (Parbhani) परभणी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
यापैकी गणेश दुधगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवली व खासदारही झाले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. (Marathwada) त्यानंतरच्या पिढीत विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक माजी आमदार सुरेश देशमुख यांनी अनेक वर्षे कॉंग्रेसचे नेतृत्व केले. माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक व सुरेश देशमुख यांच्या जोडगोळीने जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचा गाडा हाकला.
Edited By : Jagdish Pansare
माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव गणेश देशमुख हे परभणी महापालिकेचे सदस्य होते. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांच्याकडे आहे. सोनिया गांधी यांच्या विदेशी नेतृत्वाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर जिल्ह्यात सर्वात प्रथम सुरेश वरपूडकर यांनी जाहीर पाठिंबा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
अनेक वर्षे सत्ता आणि संघटनेची पदे उपभोगल्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून पाथरी विधानसभा मतदारसंघात पक्षाची उमेदवारी मिळवली. मात्र या उमेदवारीला पक्षातील निष्ठावंतांचा विरोध असल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षातील नेत्यांची नाराजी दूर केली.
अखेर २०१९ मध्ये आमदारकी मिळवत स्व:चे अस्तित्व सिद्ध केले. प्रदेश कॉंग्रेस कार्यकरीणीत प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत असणारे माजी खासदार तुकाराम रेंगे हे परभणीचेच. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाने अमेरीकेसोबत अणुकरार करताना परभणीचे शिवसेना खासदार तुकाराम रेंगे यांनी अनपेक्षितपणे कॉंग्रेस सरकारला पाठिंबा दिला. शिवसेना पक्षातून खासदारकी मिळवून अन्य पक्षाशी संधान साधणारे तुकाराम रेंगे हे तिसरे खासदार होते.
कै. अशोक देशमुख, माजी खासदार सुरेश जाधव आणि माजी खासदार तुकाराम रेंगे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेकवेळा नशीब आजमावले. मात्र अजूनपर्यंत त्यांना जनतेचा कौल मिळालेला नाही. माजी आमदार सुरेश देशमुख यांचा मुलगा गणेश देशमुख यांनी महापालिकेचे नगरसेवकपद भूषवले आहे. माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक हे अजूनही पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मात्र सद्यस्थितीत पक्षाकडून त्यांच्या निष्ठेची कुठलीही दखल घेण्यात आल्याचे दिसत नाही.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.