Mp Imtiaz Jaleel News : इम्तियाज जलील बुऱ्हाणपूर मोहिमेवर ; एमआयएम चार जागांवर जोर लावणार..

Madhya Pradesh Election : ओवेसी यांच्या प्रचार सभांचे नियोजनच करण्यात आले नव्हते, त्यामुळे ते मध्य प्रदेशात प्रचारासाठी येणार नाहीत.
Mp Imtiaz Jaleel News
Mp Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

AIMIM News : देशातील पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. पैकी मध्य प्रदेशात काँग्रेसने फक्त दोन मुस्लिम उमेदवार दिल्याने एमआयएम चांगलीच संतापली होती. काँग्रेस पक्षाला फक्त मुसलमानांची मते हवी आहेत, त्यांचे प्रतिनिधित्व नको, असा आरोप करत एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी मध्य प्रदेशात निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले होते. (Madhya Pradesh Election) त्यानूसार आता एमआयएम मध्य प्रदेशात मोजक्या चार विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाली आहे.

Mp Imtiaz Jaleel News
Manoj Jarange Patil News : पालकमंत्री अतुल सावेंचे नाव काढताच जरांगे पाटील का भडकतात ?

जबलपूर, बुऱ्हाणपूर आणि इंदौर जिल्ह्यातील दोन अशा चार मतदारसंघात एमआयएमने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. (AIMIM) या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरचे खासदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, (Imtiaz Jaleel) माजी आमदार वारीस पठाण, मोईन खान ही नेते मंडळी मध्य प्रदेशात प्रचारासाठी जाणार आहेत. सोमवारी दि. १३ रोजी इम्तियाज जलील हे बुऱ्हाणपूर मोहिमेवर जाणार आहेत.

`सरकारनामा` शी बोलतांना ते म्हणाले, मध्य प्रदेशात निवडणूक लढवण्याचा आमचा कोणातही विचार नव्हता. (Maharashtra) पण काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत केवळ दोन मुस्लिम उमेदवार देत या समाजावर अन्याय केल्याची येथील मुस्लिम समाजाची भावना आहे. त्यामुले ऐनवेळी मध्य प्रदेशातील मोजक्या चार मतदारसंघात उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या राज्यातील प्रचाराची जबाबदारी माझ्यासह वारीस पठाण, मोईन खान यांच्यावर आहे.

ओवेसी यांच्या प्रचार सभांचे नियोजनच करण्यात आले नव्हते, त्यामुळे ते मध्य प्रदेशात प्रचारासाठी येणार नाहीत. जिथे आम्ही उमेदवार दिले आहेत, तिथे आमच्या पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही इम्तियाज जलील यांनी केला आहे. एमआयएमने या राज्यात निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अनेक विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाची लोक आणि मतदार संख्या इतरांपेक्षा अधिक असूनही तिथे मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आली नसल्याचा दावा इम्तियाज यांनी केला होता.

२३० पैकी केवळ २ मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे एमआयएमने आक्रमक पवित्रा घेत निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे ३० टक्के मुस्लिम समाज आहे. तरीही स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेस पक्षाने २३० पैकी फक्त दोन विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आम्ही मध्य प्रदेशात निवडणूक न लढवण्याचा निर्णय बदलला. मुस्लिम समाजावर काँग्रेसकडून होत असलेला अन्याय आम्ही उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. काँग्रेसला फक्त मुस्लिमांची मते पाहिजे आहेत, लोकसभा किंवा विधानसभेत त्यांचे प्रतिनिधित्व नको, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com