Laxman Hake : ...तर महायुतीला मतदान करा; लक्ष्मण हाके महायुतीसाठी थेट मैदानात ...पाहा VIDEO

OBC leader Laxman Hake announced support mahayuti press conference Jalna : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच, ओबीसी नेते लक्ष्मण हाके महायुतीसाठी मैदानात उतरले आहेत.
Laxman Hake
Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : ओबीसी आरक्षणासाठी लढा उभारणारे नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीच्या बाजूने भूमिका घेत थेट मैदानात उतरले आहेत.

"ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत, वंचितचे उमेदवार आहेत तेथे ओबीसी मतदारांनी त्यांना मतदान करावे. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत, त्या ठिकाणी दगडापेक्षा वीट या युक्तीप्रमाणे महायुतीला ओबीसींनी मतदान करावे", असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जालना इथं पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी मतदारांना आवाहन केले. जिथं आपले आणि वंचितचे उमेदवार आहेत, तिथं थेट मतदान करा. जिथं दोघंही नाही, तिथं महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा, असे सांगून महायुतीला (Mahayuti) पाठिंबा असल्याचे लक्ष्मण हाके यांनी जाहीर केले.

Laxman Hake
Balasaheb Thackeray Memorial Day : मोदींच्या चॅलेंजला राहुल गांधीचं उत्तर; बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करून पंतप्रधानांना केलं निरुत्तर

लक्ष्मण हाके म्हणाले, "ज्या आमदारांनी मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाला (Maratha reservation) पाठिंबा असल्याचे लेखी पत्र दिले, त्यांना ओबीसी भटक्या विमुक्त जातींमधील मतदारांना पाठिंबा देऊ नये. त्या आमदारांनी मागील पाच वर्षात काय केले ? याचा जाब विचारावा, असे आवाहन केले".

Laxman Hake
Osmanabad-Kalamb Assembly Election : गद्दारी केली नाही म्हणून विकासकामांना महायुतीची स्थगिती : कैलास पाटील

जरांगेंमुळे ओबीसी आणि मराठा द्वेष

'महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. मोदी सरकारने घटनादुरुस्ती करून ईडब्ल्यूएसमध्ये दहा टक्के आरक्षण दिले. परंतु, हे दोन्ही आरक्षण मनोज जरांगे यांना मान्य नाही. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण हवे, असे मनोज जरांगे यांची मागणी आहे. त्यामुळे गावाकडे ओबीसी आणि मराठा, असा द्वेष निर्माण झाला आहे. हा द्वेष निवडणुकीत दिसून येत आहे', असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला.

भुजबळांच्या मतदारसंघात जरांगेची सभा

लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे हे शरद पवार यांनी दिलेल्या स्क्रिप्टनुसार काम करत आहेत. त्यामुळे 288 मतदारसंघांपैकी केवळ ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात जाऊन मनोज जरांगे यांनी सभा घेतली. विधानसभ परिषदेत ओबीसीची बाजू मांडण्यासाठी या निवडणुकीत किमान 20 ते 25 ओबीसी आमदार आम्ही निवडून देणार आहोत, असे सांगितले. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी ओबीसी समाज आपली ताकद मतदानाच्या रूपात दाखवणार आहे, असेही हाके यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com