Narendra Modi : सोयाबीन पिकासंदर्भात पंतप्रधान मोदींनी निर्णय घेत केली मोठी घोषणा... Video पाहा

PM Narendra Modi soybean crop farmers Vidarbha and Marathwada : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीन पिकासाठी हमीभावाची घोषणा केल्याने पश्चिम विदर्भातील बाजारपेठेला उत्साह आहे.
Narendra Modi 1
Narendra Modi 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासानातून दिलासा देण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुकीनिमित्ताने नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे.

प्रचारसभांमधून शेतकऱ्यांना महायुतीकडे खेचण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची आठवण करून देत आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. 'सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल', अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

दिवाळीपूर्वी येणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनची लागवड शेतकरी करतो. विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनचे अधिक उत्पादन होते. विदर्भाचा विचार करता वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर (Nagpur), चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. एकट्या पश्चिम विदर्भात 71 अब्ज रुपयांहून अधिकचे सोयाबीनचे उत्पादन होते, असे शेतीतज्ज्ञ सांगतात.

Narendra Modi 1
Sachin Pilot : पोचायचं होतं गोंदियाला, पोचले गडचिरोलीला; सचिन पायलट यांच्याबरोबर काय घडला 'किस्सा'

सोयाबीन शेतकऱ्यांना (Farmer) आधार म्हणून महायुती सरकारने पूर्वी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार, असे वचन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सोयाबीनला सहा हजार रुपयांचा हमीभाव देण्याची घोषणा केली.

Narendra Modi 1
Big Relief For Farmers: धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारने ‘ड्युटी’ रद्द केल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच विक्रमी दर

पश्चिम विदर्भात दिवाळी आणि नंतरच्या दिवसांतील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था साधारणत: सोयाबीनच्या उलाढालीवर अवलंबून असते. नेमक्या याच पिकासाठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजना आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपयांचा हमीभाव देण्याची घोषणा केल्याने पश्चिम विदर्भातील बाजारात नवचैतन्य आले आहे. दिवाळीच्या दिवसांतच हे घडल्याने शेतकऱ्यांसोबतच व्यापारीही या घोषणांच्या अनुषंगाने नियोजन करू लागला आहे. सरकारी दरासोबतच खुल्या बाजारातही सोयाबीनला अधिक दर मिळण्याची चिन्हं आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com