MLA Sandip Kshirsagar News : आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टक्केवारीचा आरोप! महायुतीचे पदाधिकारी रस्त्यावर!

Mahayuti office-bearers stage a protest against Beed MLA Sandeep Kshirsagar, accusing him of halting development funds over commission demands. : जिल्हा नियेाजन समितीमधून मंजूर झालेली रस्ता कामांचे आदेश सहा महिन्यांपूर्वी झालेले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी मार्कआऊट दिले नसल्याचा आरोप.
MLA Sandip kshirsagar  News
MLA Sandip kshirsagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : सत्ताधारी कार्यकर्त्यांचा निधी अडविला जातो, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगूनही कामांचे मार्कआऊट टाकले जात नाहीत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांकडून आमदारांची दलाली केली जाते व आमची अडवणूक केली जाते. सत्तापक्षातील पदाधिकाऱ्यांची अशी अडवणूक होणार असेल तर सत्तेचा उपयोग काय, असा संताप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बीडमध्ये (Beed News) आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. तालुक्यातील नाळवंडी, पालीसह काही रस्ता कामे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या दबावामुळे अडविल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, त्यामागील मास्टर माईंड, मंत्र्यांचा राजीनामा अशा घटनांनी गेल्या सहा महिन्यापासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आलेल्या बीडमध्ये आमदाराविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनाचा प्रकार घडला. (Sandip Kshirsagar)आंदोलनकर्ते सत्ताधारी पक्षाचे होते आणि त्यांनी आमदार व जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची नावे घेऊन थेट आरोप केले.

MLA Sandip kshirsagar  News
Beed News :'तर आमदाराला बाहेर निघू देणार नाही' शेतकऱ्यांचा इशारा

सरपंच ॲड. राजेंद्र राऊत, भाजपचे शांतीनाथ डोरले, डॉ. योगेश क्षीरसागर, अमर नाईकवाडे, महेश धांडे, डॉ. लक्ष्मण जाधव, ॲड. सतीश शिंदे, भाऊसाहेब डावकर, नंदकुमार कुटे, उत्तरेश्वर सोनवणे, सुमित कोळपे, अरुण लांडे, प्रदीप गायकवाड, धनेश्वर खेत्रे, दत्ता जाधव, रोहित जाधव, सिद्धार्थ जाधव, राजाभाऊ नवले, लकी कंडेरे, राजू टाक, सुमंत राऊत, नामदेव म्हेत्रे, सखाराम राऊत, सचिन उनवणे आदींनी हे आंदोलन केले.

MLA Sandip kshirsagar  News
Bajrang Sonawane-Sandip Kshirsagar : खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांची अजित पवारांशी जवळीक वाढली!

नाळवंडी ते मौज, काळेगाव हवेली ते लमाण तांडा, मानकुरवाडी, पाली ते वरवटी आदी जिल्हा नियेाजन समितीमधून मंजूर झालेली रस्ता कामांचे आदेश सहा महिन्यांपूर्वी झालेले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी मार्कआऊट दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना देण्यात आले. आजच्या आंदोलनातूनही प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर सोमवार, 16 जून रोजी जरुड फाटा येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com