Manoj Jarange Patil News : 'मतदान झाल्यानंतर मी जातीयवादी झालो का?' ; जरांगेंचा 'OBC' नेत्यांना सवाल!

Manoj Jarange Patil Vs OBC leaders : विधानसभा निवडणुकीबाबतही स्पष्ट केली भूमिका, जाणून घ्या काय म्हणाले आहेत?
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil NewsSarkarnama

Maratha Reservation News : 'मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावरून मला काही नेते जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान, माझ्या तोंडून OBC किंवा इतर कुठल्याही समाजाबद्दल चुकीचा शब्द गेलेला नाही. कुठे माझ्या भाषणामुळे किंवा विधानामुळे मराठा-ओबीसी वाद निर्माण झाला, अशी घटना घडलेली नाही. मग लोकसभेसाठीचे मतदान संपल्यानंतर मी अचानक जातीयवादी कसा झालो? काहीजण मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.', असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला.

अंतरवाली सराटी येथे चार जूनपासून बेमुदत उपोषणाचा निर्णय तीन महिन्यांपुर्वीच झाला होता, त्यानूसार मी उपोषण करणार, असेही मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी स्पष्ट केले. संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. चार जूनच्या उपोषणाची तारीख तीन महिन्यांपूर्वी ठरली आहे, या तारखेत कुठलाही बदल होणार नाही. असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर 'अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण केले जाणार. तुम्ही कितीही एसआयटी लावा, आरोप करा, गुन्हे दाखल करा. मात्र तुम्हाला मराठा समाजाची एकजूट, ताकद चार जूनच्या उपोषणातून दिसेल असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी या मागणीसाठी हा लढा सुरू आहे. पण मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सातत्याने सुरू आहे.' असं जरागेंनी म्हटलं.

तसेच 'मी कुठलाही जातिवाद केलेला नाही व गाव खेड्यात मराठा,ओबीसी समाजात कुठलाही जातीय तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केलेले नाही, करणार नाही. असे असताना ओबीसी नेते मला जातीयवादी म्हणत आहेत. निवडणुकीचे मतदान होईपर्यंत मी जातीयवादी नव्हतो आणि मतदान झाल्यानंतर मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.' याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

याशिवाय 'नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना प्रमाणपत्र देण्यास विलंब होत आहे. काही ठिकाणी अधिकारी मनमानी करत असून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र मी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली. तेव्हा ते बोलले, मनुष्यबळ निवडणुकीत व्यस्त असल्याने प्रमाणपत्राला थोडा विलंब होत आहे.' असं जरांगे यांनी सांगितलं.

आचारसंहिता नंतर 20 तारखेपासून प्रक्रिया गतीने सुरू होईल. विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार देण्यासंदर्भात केलेल्या विधानावर जरांगे यांनी पुन्हा आपली भूमिका मांडली. मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही तो माझा मार्ग नाही. मात्र मागण्या मान्य केल्या नाहीत तर समाजाला येत्या विधानसभा निवडणुकीत उतरवणार, हे जरांगे यांनी ठणकावून सांगतिले. त्यांच्या या भूमिकेमुळे ते स्वतः परळी व गेवराईतून विधानसभा निवडणूक लढवणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com