Manoj Jarange : मनोज जरांगेंचे मराठा समाजाला दोन मोठे संदेश; सत्ताधाऱ्यांना इशारा...

Beed Shantata Rally : लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचे 30 हजार मतदान वाया गेले
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSatrkarnama

Maratha Reservation News : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे नियोजन केले आहे. बीडमधील रॅलीत जरागांनी मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधकांवरही हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला दोन संदेश दिले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाजाबाबत अभिमान असल्याचे सांगून मनोज जरागेंनी Manoj Jarange सत्ताधाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले, या पुढे मराठा समाजाला दोन गोष्टी सांगतो, त्यांची अंमलबजावणी करताना कसलीही चूक होता कामा नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यातील एक म्हणजे गरीब मराठ्यांवर अन्याय होताना त्यांना साथ देणे, तर दुसरी बाब ही विधानसभा निवडणुकीतील मतदानाबाबत आहे. त्यामुळे हा सत्ताधारी पक्षांना इशारा असल्याचे बोलले जाते.

मनोज जरांगेंनी दिलेला पहिला संदेश म्हणजे, गोरगरीब मराठ्यावर Maratha कोणी अन्याय करत असेल तर त्यांच्या मदतीला जाणे. ते म्हणाले, वेळ सर्वांवर येते. त्यामुळे कुणावर अन्याय होत असेल तर फक्त बघ्याची भूमिका घेऊ नका. तुम्ही त्यांच्यासोबत गेला तरी त्यांच्यावरील अन्याय कमी होईल. तसेच गरीब मराठ्यांनी स्वतःला गरीब समजू नये. आपल्याला काय करायचे त्या लफड्यात पडून, असे म्हणू नये. गरीबानेच गरीबाला मदत करून जगावे लागणार आहे. श्रीमंत मराठे आपल्या मदतीला येणार नाहीत, याकडेही जरांगेंनी लक्ष वेधले.

विधानसभा निवडणुकीत मराठ्यांनी एकालाच कुणाला तरी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहनच जरांगेंनी केले. लोकसभेत आपल्या काही चुका झाल्या आहेत. यापूर्वी, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडून आणा, असे म्हणालो होतो. काही हुशार लोकांनी व्यवस्थित कार्यक्रम केला. मात्र काहींची मात्र नाव न घेतल्याने गडबड झाली, असेही त्यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil
Manoj jarange News : आमची मतं गोड वाटतात; आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला न गेलेल्या 'मविआ'ला जरांगेंनी झापलं

लोकसभेत आपले 30 हजार मतदान वाया गेल्याचा दावाही जरांगेंनी केला. ते म्हणाले, प्रत्येक मतदारसंघातील 10 हजार मतदान नको तिकडे गेले. तर दोन्ही उमेदवार पसंत नसल्याने 20 हजार मतदारांनी मतदानच केले नाही. त्यामुळे कोणालाही मतदान करा ते शंभर टक्केच करावे, असे जरांगेंनी पाटील यांनी सांगितले.

आता जे सत्तेत आहेत ते मराठ्यांच्या चुकीमुळेच आहेत. मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याला आडवा करा, मग तो मराठ्यांचा असो की ओबीसींचा हे पाहू नका. आरक्षण दिले नाही तर आता नाव घेऊनच पाडणार आहे, असेही जरांगे पाटील यांनी इशारा दिला.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange @ Beed : जरांगेनी हाकेंचा विषय दोनच शब्दांत संपवला; मुख्यमंत्र्यांच्या 'ओएसडीं'नाही सोडलं नाही, करून दिली 'ती' आठवण!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com