Manoj jarange Patil
Manoj jarange PatilSarkarnama

Manoj Jarange Patil : निवडणुकीसाठी जरांगेंचा फायनल निर्णय जाहीर ; कुणाला निवडून आणायचे, कुणाला पाडायचे VIDEO पाहा

Manoj Jarange Patil Big decision on Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आपण कुणाच्या पाठीशी आहे, त्यांचा बॅाड करुन घ्या, त्याचा व्हिडिओ करा, तो व्हिडिओ व्हायरल करा, असे जरांगे म्हणाले.
Published on

"तुमच्या हिताचा निर्णय घ्या, ज्याला पाडायचं त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा," असे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मराठा समाजात आता संभ्रम नसावा, आपण कुणाच्या पाठीशी आहे, त्यांचा बॅाड करुन घ्या, त्याचा व्हिडिओ करा, तो व्हिडिओ व्हायरल करा, असे जरांगे म्हणाले. तुमच्या मदतीला कोण धावून येतो, ते पाहा, आणि मतदान कुणाला करायचं ते ठरवा, अशा सूचना मनोज जरांगेंनी आज दिल्या.

Manoj jarange Patil
Maval Politics: बापू भेगडे- सुनील शेळके यांचे कार्यकर्ते भिडले; लोणावळ्यात राडा

कुणाच्याही प्रचाराला जाऊ नका, आपल्या मतांशी सहमत असलेल्यांना मत द्या, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सोडू नका, असे जरांगे यांनी सांगितले. (Manoj Jarange Patil Big Decision)

जरांगे म्हणाले,"मराठ्यांची पोरं अडचणीत आहेत, आरक्षण मिळाले नसल्याने अन् शेती मालाला भाव नसल्यामुळे अडचणीत आहेत. त्यासाठी हे आंदोलन,संघर्ष सुरुच राहणार आहे. माझा आरक्षणामध्ये जीव आहे. आरक्षणापासून मी भूमिका बदलत नाही. मला मराठा समाज शंभर टक्के आरक्षण देऊन मोकळा करायचा आहे. निवडणुकीत मोठा होण्यासाठी रडरड करणारे खूप आहेत, त्यांनी ही रडरड समाजाच्या आरक्षणासाठी करावी,असे खडेबोल जरांगे यांनी सुनावले.

Manoj jarange Patil
Jayant Patil : अरे, तुमचा काकाच हा विषय पूर्ण करणार ; जयंतरावांचे अजितदादांना प्रत्युत्तर

"निवडणुकीमध्ये मराठा समाज सक्रीय आहे. मराठ्यांना कुणाला मतदान करायचे ते बरोबर कळते. त्यांच्यात संभ्रम नाही. ते वाट बघत असले तरी वेळेवर बरोबर काम करतील, आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहेत आणि सहा कोटी मराठ्यांना खेटणे सोपे नाही, आमचे आंदोलन सुरू करणार आहे," असे मनोज जरांगे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com