Manoj Jarange Patil Health : सलग नऊ दिवस उपोषणामुळे जरांगेंच्या शरीरावर गंभीर परिणाम; डॉक्टर म्हणाले, 'किडनी-लिव्हरला..'

Manoj Jarange Patil Health News : रक्त तपासणीच्या रिपोर्टमध्ये चिंताजनक निष्कर्ष...
Manoj Jarange Patil Health
Manoj Jarange Patil HealthSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण अस्त्र उगारले होते. सरकारच्या वतीने आलेल्या शिष्टमंडळाने आश्वासनानंतर सलग नऊ दिवसांच्या कालावधीने जरांगेंनी आपले उपोषण आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, या नऊ दिवसांत जरांगेंची प्रकृती खालवली होती, त्यांना बोलताना त्रास जाणवत होता. उपोषण स्थगितीनंतर जरांगे वैद्यकीय उपचार घेत आहेत. डॉ. चावरे यांनी जरांगेच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil Health
Bachchu Kadu News : ...तोपर्यंत बच्चू कडू जरांगे पाटलांच्या अंतरवालीत तळ ठोकून राहणार !

जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणारे डॉ. चावरे यांनी जरांगे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. डॉ. चावरे म्हणाले, "जरांगेंची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अशक्तपणा खूप आहे. वजन पहिल्यापेक्षा जास्त घटलेलं आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती पूर्ववत व्हायला वेळ लागेल. त्यांच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. सर्व आवश्यक उपचार सुरू केले आहेत. रक्त तपासणी कालच पाठवल्या गेल्या आहेत. या रिपोर्टनुसार त्यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आलेली आहे. याबाबतीत आता आवश्यक ते उपचार सुरू केले आहेत."

शिष्टमंडळाच्या भेटीनंतर उपोषण स्थगित -

मनोज जरांगे पाटील यांनी अखेर नवव्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी गावात पोहोचले होते. या शिष्टमंडळात निवृत्त न्यायमूर्तींसह मंत्री धनंजय मुंडे, मंत्री उदय सामंत, अतुल सावे, संदीपान भुमरे यांचाही समावेश होता. या शिष्टमंडळाला जरांगेंची समजूत काढण्यात यश आले.

Manoj Jarange Patil Health
Mp Imtiaz Jaleel News : मराठा आरक्षणाचे आंदोलन दिल्लीपर्यंत न येऊ देण्याचे भाजप नेत्यांना होते आदेश...

2 जानेवारी डेडलाइन -

मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) 2 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर सरकारला पुन्हा एकदा अडचणीत आणणारा निर्णय घेतला आहे. या वेळी जरांगे यांनी आपण उपोषण सोडत असल्याची घोषणा केली खरी, पण 2 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com