Maratha-OBC News : अंतरवाली-वडीगोद्रीत एसआरपीच्या दोन तुकड्या, चाळीस पोलीस अधिकारी, साडेचारशे कर्मचाऱ्यांसह होमगार्ड तैनात!

Manoj Jarange Patil reached Antarwali while Laxman Hake was in Wadigodri. Police tension increased : गेवराईत आमदार विजयसिंह पंडीत आणि लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. या घटनेनंतर पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता लक्षात घेऊन यंत्रणा संतर्क झाली आहे.
Manoj Jarane Patil-Laxman Hake In Jalna News
Manoj Jarane Patil-Laxman Hake In Jalna NewsSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange News : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव उद्या (ता. 27) अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना गणेशोत्सवाच्या काळातील गर्दी लक्षात घेता आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश दिले आहेत. तरीही मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना विरोध करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आपल्या समर्थकासंह अंतरवाली सराटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडीगोद्रीमध्ये दाखल झाले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी वडीगोद्री आणि अंतरवाली सराटीमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. काल गेवराईत आमदार विजयसिंह पंडीत आणि लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. या घटनेनंतर पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा संतर्क झाली आहे.

पोलिसांनी वडीगोद्री येथे मोठा बंदोबस्त तैनात केला असून, या गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. (Laxman Hake) 40 वरिष्ठ पोलिस अधिकारी, 190 कर्मचारी, गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) 250 जवान, एसआरपीएफच्या दोन तुकड्या या गावात तैनात करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर अंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने मराठा बांधव दाखल होत आहेत.

Manoj Jarane Patil-Laxman Hake In Jalna News
Bajarang Sonawane On Laxman Hake : बीड जिल्ह्यात मोठे ओबीसी नेते; तुमची गरज नाही! बंजरंग सोनवणे यांनी हाकेंना सुनावले..

मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमित्याच्या आज झालेल्या बैठकीत न्यायमुर्ती शिंदे समितीला सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी याची घोषणा केली आहे. परंतु मराठा आरक्षणावर निर्णय व अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ दिला, आता अंमलबजावणी कधी करणार? हे सरकारने सांगावे, अन्यथा मुंबईत जाणारच, असे मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अंतरवाली सराटी आणि वडीगोद्रीमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com