Manoj Jarange Mumbai March : ‘अमृता फडणवीस, लता शिंदेंच्या घरी हळदीकुंकू करा’; जरांगेंचा फडणवीस-शिंदेंना थेट इशारा

Manoj Jarange announces Mumbai march over Maratha reservation, targeting Fadnavis and Shinde with a new protest strategy : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच; ‘दारात थांबा, आम्ही आझाद मैदानात’ म्हणत जरांगेंनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली
Manoj Jarange Mumbai March
Manoj Jarange Mumbai MarchSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Latest Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करण्याची घोषणा करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

यावेळी त्यांनी मराठा महिला आंदोलकांना अमृता फडणवीस आणि लता शिंदे यांच्याबरोबर हळदीकुंकू करण्याचे आवाहन करत आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

जरांगे पाटील म्हणाले की, मराठा महिला आंदोलकांनी अमृता फडणवीस आणि लता शिंदे यांच्या घरी हळदीकुंकूसाठी जावे आणि त्यांच्याकडे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) निरोप द्यावा. सौभाग्याचं लेणं घेऊन महिला दारात आल्या आणि ते स्वीकारलं नाही, तर मग हे हिंदुत्व कसे?, असा सवाल करत त्यांनी फडणवीस आणि शिंदे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरून टोला लगावला.

महिला आंदोलक मोठ्या संख्येने हळदीकुंकूसाठी घराबाहेर आल्या आणि त्यांना भेट नाकारण्यात आली, तर त्याचा राजकीय संदेश मोठा जाईल, असा दावा जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केला. आंदोलन करताना केवळ घोषणांपेक्षा वेगळी रणनीती वापरण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

Manoj Jarange Mumbai March
Amruta Fadnavis reaction : “माझा भाऊ जे करायचे ते शांततेतच करतील”; जरांगे पाटलांच्या मुंबईकूचवर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

यावेळी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेचाही उल्लेख केला. शिंदे यांच्या 'लाडक्या बहिणी' आणि फडणवीस यांच्या 'लाडक्या दीदी' असा उल्लेख करत त्यांनी महिला आंदोलकांच्या उपस्थितीवरून सरकारला लक्ष्य केले. लाडक्या बहिणींना दोन भाऊ आहेत. त्यांना मंडप घालतील; आम्हाला आझाद मैदानात मंडप नाही, असे म्हणत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

Manoj Jarange Mumbai March
Manoj Jarange Patil on Vikhe Patil : "विखे पाटलांमुळे मराठ्यांचं वाटोळंच झालं!" जातीसाठी राजीनामा द्या! जरांगेंचा राजीनाम्यासाठी थेट हल्लाबोल!

फडणवीस अन् शिंदेंकडे मोठी ताकद

पाच लाख महिलांना जेवण देण्याच्या नियोजनाचा उल्लेख करत त्यांनी आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात संसाधनांची गरज असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मोठी ताकद आणि साधनसंपत्ती असल्याचा दावा करत त्यांनी आंदोलकांना आपल्या मागणीवर ठाम राहण्याचे आवाहन केले.

भूमिका न बदलण्याचे आवाहन

मराठा आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. आता भूमिका बदलू नका. शांततेत खूप ताकद आहे, असे ते म्हणाले. तसेच, तुम्ही दारात थांबा, आम्ही आझाद मैदानावर आहोत, असे सांगत त्यांनी मुंबईतील आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com