Manoj Jarange News : मुंडेंच्या परळीत धडाडणार जरांगे पाटलांची तोफ; घोंगडी बैठकीत काय बोलणार ?

Political News : मुंडेंच्या परळीत घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने परळीत जरांगे पाटलांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dhanjay Munde, Pankaja Munde, Manoj Jarange
Dhanjay Munde, Pankaja Munde, Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये लगीनघाई सुरु आहे. महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप सुरु झाले आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ कोणाला सुटणार यावरून उत्सुकता ताणली गेली असतानाच मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी मुंडेंच्या परळीत घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने परळीत जरांगे पाटलांची तोफ धडाडणार आहे. परळी मतदारसंघ मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा गड मानला जातो. त्यामुळे यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Manoj Jarange News)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jaranage) यांच्या उपस्थितीत रविवारी मुंडेंच्या परळीत घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 नंतर शहरातील हलगी गार्डन येथे ही घोंगडी बैठक होणार असून या बैठकीतून जरांगे पाटील काय बोलणार ? याकडे मराठा बांधवांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या घोंगडी बैठकीच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात मोठमोठे होर्डिंग देखील उभारण्यात आले असून सर्वत्र भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. जरांगे पाटील यांची गेवराई, तेलगाव येथे यापूर्वी घोंगडी बैठक झाली असून यानंतर आता परळी येथे होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dhanjay Munde, Pankaja Munde, Manoj Jarange
Congress News : राजकीय आखाड्यातील बजरंग, विनेशच्या नव्या डावाने भाजप हैराण; काँग्रेसमध्ये नवचैतन्य !

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रणनीती आखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्वच सहाही मतदारसंघांत घोंगडी बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकांच्या निमंत्रणासाठी मराठा सेवक गावोगाव पिंजून काढत असून या दौऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

विशेष म्हणजे महिलांचीही उपस्थिती लक्षणीय दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी आता जरांगे पाटलांचा मास्टर प्लॅन ठरला आहे. त्यानुसार रणनीती आखली जात आहे.

Dhanjay Munde, Pankaja Munde, Manoj Jarange
Shivsena News : शिवसेनेच्या जगतापांनी फोडला बॉम्ब; अबब...बीड मतदारसंघात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com