Bajrang Puniya, vinesh fogat
Bajrang Puniya, vinesh fogat Sarkarnama

Congress News : राजकीय आखाड्यातील बजरंग, विनेशच्या नव्या डावाने भाजप हैराण; काँग्रेसमध्ये नवचैतन्य !

Political News : बजरंग, विनेश या दोघांनी टाकलेल्या नव्या डावाने भाजप चांगलीच हैराण झाली असून हरियणामध्ये आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा काँग्रेसला होणार असल्याने नवचैतन्य पसरले आहे.
Published on

Political News : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी राजकारणात एंट्री केली आहे. आतापर्यंत कुस्तीच्या आखाड्यात उतरून भारतासाठी अनेक पदके जिंकणाऱ्या या दोघांने आता राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी विनेश-बजरंग यांनी कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष व भाजप (Bjp) नेते ब्रिजभूषण यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्याविरोधात आंदोलन करीत आवाजही उठवला होता. त्यामुळे त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले होते.

त्यानंतर आता विनेश-बजरंग या दोघांनी नवा डाव टाकत काँग्रेसमध्ये प्रवेश करीत राजकीय आखाड्यात एंट्री केली. नुकतीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांचा काँग्रेसमधील (Congress) प्रवेश निश्चित समजला जात होता. प्रवेश केल्यानंतर लगेचच विनेश फोगटला विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली. या दोघांनी टाकलेल्या नव्या डावाने भाजप चांगलीच हैराण झाली असून हरियणामध्ये आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा काँग्रेसला होणार असल्याने नवचैतन्य पसरले आहे. (Congress News)

विनेश फोगटचा राजकारणातील प्रवेश तसा पहिला तर आश्चर्यकारक मानला जात आहे. बरोबर एक महिनाभरापूर्वी म्हणजेच 6 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ती आपली ताकद दाखवत होती, पण आता महिनाभरानंतर म्हणजेच 6 सप्टेंबरला तिने राजकीय पदार्पण करीत नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. गेल्या एका महिन्यात विनेशच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. विनेशने प्रथम पॅरिस ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली. त्या अंतिम फेरीत विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, पण त्याआधीच काही अनपेक्षित घडले.

भारतीय चाहत्यांना विनेश फोगट अंतिम सामना जिंकून इतिहास रचेल अशी आशा होती. मात्र भारताला आतापर्यंत कुस्तीमध्ये एकही ऑलिम्पिक सुवर्ण जिंकता आलेले नाही. पण 7 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता आलेल्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. विनेश पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली होती. खरे तर अंतिम सामन्यापूर्वी त्याचे वजन मोजण्यात आले तेव्हा त्याचे वजन 50 किलो गटात खेळण्यापेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. या सर्व घटनेमुळे तिचे आयुष्यच अचानक बदलेले.

Bajrang Puniya, vinesh fogat
Shivsena News : शिवसेनेच्या जगतापांनी फोडला बॉम्ब; अबब...बीड मतदारसंघात...

अपात्रतेच्या धक्क्यानंतर ती काही काळ बेशुद्ध ही झाली होती. या स्पर्धेसाठी अपात्र ठरल्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती घेतली. मात्र, विनेशने इंस्टाग्राम पोस्टद्वारे मॅटवर परतण्याचे संकेत दिले होते. दुसरीकडे, विनेशनेही या निर्णयाविरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये अपील केले होते. तिला एकत्रित रौप्य पदक देण्याची मागणी केली होती. मात्र, सीएएसने स्टार कुस्तीपटू विनेशचे अपील फेटाळून लावले. त्यानंतर विनेश घरी परतली. मायदेशी परतल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विनेशने 6 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिला सामना खेळला होता. त्यानंतर आता 6 सप्टेंबरला म्हणजे केवळ महिनाभरातच तिने राजकारणात प्रवेश केला.

या सर्व घटनाक्रमानंतर आता विनेश आणि बजरंग कुस्तीचा आखाडा सोडून येत्या काळात हरियाणातील राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार विनेशला दादरीतून तिकीट दिले जाऊ शकते. त्याचबरोबर बजरंग यांना जाट बहुल कोणत्याही जागेवरून उमेदवारी दिली जाऊ शकते. नुकतीच बजरंग आणि विनेश यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवली असल्याचे समजते.

Bajrang Puniya, vinesh fogat
Rohit Pawar : 'तुम्ही पण काचेच्या घरात राहता, विसरू नका'; रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया हे दोघेही रेल्वेत नोकरी करीत होते. विनेश आणि बजरंग यांनी ही रेल्वेची नोकरी सोडली. दोघेही ओएसडी स्पोर्ट्स पदावर होते. त्यामुळे भाजपकडून त्यांना राजीनामा दिल्यानंतरही रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या या त्रास देण्याच्या भूमिकेवरून दोघेही नाराज आहेत.

विनेश हिचा संघर्ष संपूर्ण देशाने पहिला आहे. वाईट काळात त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांच्या पाठीशी भाजप वगळता देशातील प्रत्येक पक्षसोबत होता. बजरंगवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानं आवाज उठवल्यामुळेच त्याच्यावर कारवाई करण्यात आली. मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या वेळी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला. कुस्ती, शेतकरी चळवळ, आमची चळवळ यामध्ये या दोघांनी खूप कष्ट घेतले आहे. त्यामुळे येत्या काळात या दोघांना संघर्षाचे फळ मिळण्याची शक्यता आहे.

Bajrang Puniya, vinesh fogat
Assembly Election 2024 : महाराष्ट्रावर छत्तीसगड, गुजरातची 'स्वारी', भाजपचा बाजार भरवणार की उठवणार?

विनेशने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जिंद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघातून विनेशला उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे बजरंग पुनियाला स्टार प्रचारकपदाची जबाबदारी मिळू शकते.

बजरंग झज्जरची बदली सीट मागत होता. येथील विद्यमान आमदार कुलदीप वत्स यांचे तिकीट रद्द करण्यास काँग्रेसने नकार दिला आहे. त्यामुळे बजरंगलाही संघटनेत मोठे पद दिले जाऊ शकते. आता हे दोघेही कुस्तीचा आखाडा सोडून राजकीय मैदानात उतरून विरोधकांना चारी मुंड्या चीत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Bajrang Puniya, vinesh fogat
CM Eknath Shinde Interview : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार ? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com