Manoj Jarange Patil News : समाजाचं प्रेम म्हणून जेसीबीतून फुलांची उधळण, मी त्यांना कसं रोखू...

Maharashtra News : गेल्या ७० वर्षांत दिसली नाही ती एकजूट आता मराठा समाजामध्ये दिसत आहे.
Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Maratha reservation News : मराठा आरक्षणासाठी कधी नव्हे तो समाज एकजूट झाला आहे, आतापर्यंत हे कधीही झालं नव्हतं. आपल्या लेकरा-बाळांसाठी मराठा समाजाने एकत्र येण्याची भूमिका घेतली, याचा मला सर्वाधिक आनंद आहे. लोक जेसीबीने माझ्यावर फुलं उधळतात म्हणून काहीजण टीका करतात. (Manoj Jarange Patil News) पण समाजाचं हे प्रेम आहे, मी कितीही नाही म्हटलं तरी ते ऐकत नाहीत. एका प्रेमळ भावनेतून लोक माझ्यावर फुलं उधळतात, मग मी त्यांना कसं रोखू, मी त्यांना थांबवणार नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी जेसीबीतून फुलं उधळणाऱ्या समाज बांधवांची पाठराखण केली.

Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil News : मला कुणी सांगितले नाही, मनाला वाटले म्हणून शब्द मागे...

मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील गाठी-भेटी दौऱ्याला 1 डिसेंबरपासून जालना येथील जाहीर सभेने सुरुवात होत आहे. (Chhagan Bhujbal) तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत असलेल्या जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. 1 ते 12 डिसेंबर दरम्यानच्या दौऱ्यात जरांगे पाटील खान्देश, मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील 40 पेक्षा जास्त गावांना भेटी देणार आहेत.

त्यांच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाते. विशेषतः शंभर-शंभर जेसीबीतून फुलं उधळणारा समाज गरीब कसा? अशी टीकाही त्यांच्यावर केली गेली. (Maratha Reservation) यासंदर्भात समाजाचं प्रेम असल्यामुळे ते माझ्यावर फुलं उधळतात, मी त्यांना रोखू शकत नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. रात्री-अपरात्री उशिरा सभा घ्याव्या लागतात, यामागेही समाजाचे प्रेम हेच कारण आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्या गावांमध्ये माझा नियोजित दौरा नाही, त्या गावातही लोकांच्या आग्रहाखातर मला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे नियोजित सभा किंवा कार्यक्रमाला संबंधित गावाला जायला उशीर होतो, पण कितीही उशीर झाला तरी लोक समाजासाठी, आपल्या लेकरांचं भलं व्हावं, यासाठी कितीही रात्र झाली तरी वाट पाहत असतात. अशावेळी त्यांना डावलून जाणं मला शक्य होत नाही, त्यामुळे भाषण करावे लागते. टीका करणाऱ्यांना करू द्या, समाजाचं प्रेम, त्यांची तळमळ त्यांना कधीच कळणार नाही.

गेल्या ७० वर्षांत दिसली नाही ती एकजूट आता मराठा समाजामध्ये दिसत आहे. शेतातली काम, नोकरी, व्यवसाय एक दिवस बंद ठेवून प्रत्येकजण या लढ्यात सहभागी होतो आहे. त्याला कोणी जबरदस्ती करत नाही, तो आपल्या मनाने आणि मुलाबाळांच्या भविष्यासाठी येतो आहे, असेही जरांगे म्हणाले. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळाले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

यावर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा देऊ नये, त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. ज्यांना समाजाच्या भावना कळत नाही, त्या व्यक्तीला आता महत्त्वच द्यायचं नाही, असं आम्ही ठरवलं आहे. अशा जुनाट नेत्यांविषयी आम्हाला काही देणंघेणं नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यासंदर्भात बोलणे टाळले. राहिला प्रश्न ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा तर ते आता मिळूच लागले आहे. कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले म्हणजे त्याला ओबीसीचे आरक्षण लागूच झाले ना, असा उलट सावलही जरांगे यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com