Manoj Jarange Patil PC
Manoj Jarange Patil PC Sarkarnama

Manoj Jarange Patil| मोठी बातमी : मनोज जरांगेंना भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळात 'या' मंत्र्यांचा समावेश!

Manoj Jarange Patil PC : मागील नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणावर
Published on

Jalna News : मागील नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणावर बसणारे मनोज जरांगे पाटील यांना सरकारकडून एक शिष्टमंडळ भेटायला जाणार अशी माहिती आहे. मात्र, या शिष्टमंडळात मंत्री अतुल सावे, संदीरान भुमरे, नारायण कुचे हे भेट घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव हे जरांगे यांच्या भेटील जाणार आहेत. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil PC
MLA Jayant Patil News : मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांची 'ती' प्रमुख मागणी फेटाळली ? जयंत पाटलांच्या दाव्यामुळे पेच वाढला

जरांगेच्या भेटीला जाणाऱ्या शिष्टमंडळात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांचा समावेश आहे. साम टीव्ही वृत्तवाहिनेने या संबंधीचे वृत्त दिले आहे. जरांगे हे मागील नऊ दिवसांपासून उपोषणावर बसलेले आहेत. त्यांची प्रकृतीदेखील खालावली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे.

फडणवीसांना चर्चेचे निमंत्रण -

सह्याद्री अतिथिगृहावर काल सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत फडणवीसांना चर्चेसाठी बोलावलेलं आहे. “आम्ही चर्चा व्हावी, यासाठी मागील चार दिवसांपासून तयारी दाखवत आहोत; पण सरकारच्या वतीने कुणी येत नाही, पण यांनाच काड्या टाकायची सवय. म्हणूनच मराठे दम धरत नाहीत. मराठे तापट आहेत. फडणवीसांनी चर्चेला यावं, रस्त्यावर तुम्हाला कुणीही अडवणार नाही, माझे मराठा तुम्हाला संरक्षण देतील, असेही जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil PC
Uddhav Thackeray News : मराठा - धनगर आरक्षणासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; थेट राष्ट्रपतींनाच पत्र, केली 'ही' मागणी

एकनाथ शिंदेंचं आवाहन -

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी काल (ता. १) सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाची सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी 'मनोज जरांगे यांच्या प्रामाणिकपणावर आम्हाला विश्वास आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारही प्रमाणिक प्रयत्न करत आहेत. सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे,' अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com