Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर लढाई लढत आहेत. ते माझे भाऊ आहेत. त्याची आणि माझी लढाई एकच आहे. मी न्यायालयीन लढाई लढतो आहे. रस्त्यावरची आणि न्यायालयीन या दोन्ही लढाया महत्त्वाच्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हेच आमच्या दोघांचेही उदिष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत माघार घेतली नसती तर आज वेगळे चित्र दिसले असते, असेही पाटील म्हणाले.
ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी लाखो मराठा बांधवांना सोबत घेऊन निघाले आहेत. ऐन गणेशोत्सावत हे आंदोलन होत असल्याने राज्य सरकार अडचणीत आले आहे. मनोज जरांगे पाटील यांना आधी आझाद मैदानात परवानी नाकारण्यात आली, तर आता एक दिवसाची परवानगी देण्यात आली. दरम्यान, एका आंदोलकाचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटनेने वातावरण अधिकच तापले आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी या आंदोलनावर भाष्य केले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी निवडणुकीत माघार घ्यायला नको होती, तेव्हा मोठी चूक झाली. निवडणुका लढल्या असत्या तर हार-जीत यापेक्षा गावागावात नेतृत्व तयार झाले असते. याचा मोठा राजकीय दबाव सरकारवर आला असता. निवडणुकीतून माघार ही त्यावेळी झालेली मोठी चूक होती, असे विनोद पाटील म्हणाले.
आम्ही निवडून आलो असतो, पडलो असतो, पण राज्यामध्ये एक राजकीय दबदबा राहिला असता. आज निवडणुका निघून गेल्या आहेत. निश्चितपणे त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यायला नको होती. मात्र त्यावेळी मिस्टेक झाली. आम्ही जर निवडणूक लढवली असती, कमी जास्त मत पडली असती, परंतु त्या -त्या भागामध्ये आमचं एक नेतृत्व तयार झालं असतं आणि राजकीय पक्षांना सुद्धा दखल घ्यावी लागली असती.
माझी भावना एकच आहे, मी न्यायालयाची लढाई लढतो आहे. मुंबई हायकोर्टात आम्ही जिंकलो परंतु सुप्रीम कोर्टात हरलो. मनोज जरांगे पाटील सुद्धा रस्त्यावरची लढाई लढत आहेत. त्यामुळे आमच्या दोघांचे उद्दिष्ट एकच आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. रस्त्यावरची लढाई सुद्धा महत्त्वाची आहे आणि न्यायालयीन लढाई सुद्धा. समितीला मुदतवाढ देण्याची पद्धत आहे. ते जितक्या वेळेस मागतील तितक्या वेळेस ती द्यावी लागेल, असेही विनोद पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.