Manoj Jarange Patil On Farmers Issue News
Manoj Jarange Patil On Farmers Issue NewsSarkarnama

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील म्हणतात, शंभर वर्षात झाले नसेल असे आंदोलन उभारणार! दिवाळीनंतर निर्णय

Manoj Jarange Patil Warn Government For Farmers : धाराशीव दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अतिवृष्टी आणि महापूराने उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करायचे असेल तर शेतकरी कर्जमुक्तीशिवाय पर्याय नाही.
Published on
Summary
  1. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी नवीन आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे.

  2. मराठा आरक्षण चळवळीनंतर आता ते शेतकरी हक्कांच्या लढाईसाठी पुन्हा मैदानात उतरणार आहेत.

  3. राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

Farmers Loan Waiver News : बांधावर पाहणी, चिखल तुडवत शेतात फेरफटका मारून काही होत नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि शेतमालाला भाव यासाठी सरकारच्या मुंडक्यावर पाय द्यावा लागेल. मोठे आंदोलन उभारल्याशिवाय शेतकऱ्याच्या हाती काही लागणार नाही. दिवाळीनंतर या मुद्यावर आपण मोठे आंदोलन राज्यात उभे करणार आहोत. त्यासाठी लवकरच राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठक घेवून आंदोलनाची दिशा ठरवू, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

धाराशीव दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अतिवृष्टी आणि महापूराने उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करायचे असेल तर शेतकरी कर्जमुक्तीशिवाय पर्याय नाही. रॅली काढून, शेतात चिखल तुडवून काहीही होणार नाही. कर्जमुक्तीसाठी न भूतो न भविष्यती असे मोठे आंदोलन उभे करावे लागेल. सरकारच्या मुंडक्यावर पाय दिला तरच हे शक्य आहे. यासाठी दिवाळीनंतर राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवू आणि मागण्या मान्य करून घेऊ, असेही जरांगे म्हणाले.

राज्यात विशेषतः मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपांचे काम काहीसे थांबले आहे. पण पंधरा दिवसात कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करा, त्याशिवाय कुठलीही नोकरभरती करू नका, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चांगला निर्णय घेतला, फडणवीसांचे कौतुकच आहे, पण आता त्यांनी दिलेला शब्द पाळावा ही विनंती, असेही जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil On Farmers Issue News
Dhananjay Munde Manoj Jarange criticism : भर सभेतून पवारांच्या शिलेदाराचा धनंजय मुंडेंना फोन; जरांगेंवर एका वाक्यात बरसले, टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही!

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत 2 सप्टेंबर रोजी कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील शासन आदेश जारी केला. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे हा शासन निर्णय झाल्याने मराठवाड्यातील कुणबींना ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाच्या विरोधात ओबीसी नेते व समाज रस्त्यावर उतरले असले तरी शासन मात्र निर्णयावर ठाम आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन तशी ग्वाही देखील दिली.

Manoj Jarange Patil On Farmers Issue News
Flood Affected Farmers Maharashtra : नुकसानग्रस्तांच्या पॅकेजमध्ये 'चलाखी'; अजित नवलेंकडून 'पोलखोल', शेतकऱ्यांच्या वाईट काळात सरकारला कसं काय सुचू शकतं?

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि शेतमालाला भाव या मागणीसाठी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. दिवाळीनंतर राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठक घेवून सरकारला धडकी भरवणारे आंदोलन करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगीतले. गेल्या शंभर झाले नाही असे हे आंदोलन असेल, असा दावाही त्यांनी केला.

5 FAQs

1. मनोज जरांगे पाटील कोणते आंदोलन उभारणार आहेत?
ते शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलन उभारणार आहेत.

2. हे आंदोलन कुठे होणार आहे?
हे आंदोलन महाराष्ट्रभर टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून प्रमुख ठिकाणी सभांचे आयोजन होईल.

3. सरकारकडे कोणत्या मुख्य मागण्या करण्यात आल्या आहेत?
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतमालासाठी कायदेशीर हमीभाव आणि शेतकरी कल्याण योजना राबविण्याची मागणी आहे.

4. हे आंदोलन मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित आहे का?
नाही, पण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासोबतच शेतकऱ्यांच्या हितासाठीही लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.

5. जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर काय होईल?
ते राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारतील आणि शेतकऱ्यांसाठी निर्णायक लढा सुरू करतील, असा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com