Chhagan Bhujbal Beed OBC meeting : भुजबळ बीडमध्ये येत जरांगेंना भिडणार; तारीख ठरली, सरकारकडे करणार प्रमुख दोन मागण्या

Manoj Jarange Protest Laxman Hake Announces OBC Rally in Beed with Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये ओबीसी मेळावा होणार असल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली.
Chhagan Bhujbal Beed
Chhagan Bhujbal BeedSarkarnama
Published on
Updated on

Laxman Hake statement OBC rally : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात महायुती सरकारने मागण्या मान्य करत अध्यादेश काढला. हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप देखील सुरू झाले. थेट ओबीसी आरक्षणाला धक्का बसल्याची भावना बळावल्याने लक्ष्मण हाके यांनी तर, राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या मान्य केलेल्या मागण्याविरोधात तीव्र संघर्ष उभारला आहे.

ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आता मैदानात उतरण्याचं निश्चित केलं आहे. जरांगे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात बीडमध्ये ओबीसींचा मेळावा घेण्याचं मंत्री भुजबळांनी निश्चित केलं असून, लक्ष्मण हाकेंनी त्याची तारीख आणि तयारी कशी सुरू आहे, हे सगळं सांगून टाकलं आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी असलेल्या मागण्या मान्य केल्या. राज्यातील महायुती सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्याचा अध्यादेश देखील काढला आहे. हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातील मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप देखील सुरू केले आहे. यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसू लागल्याचा भावना ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांमध्ये बळावली आहे.

लक्ष्मण हाके यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी महायुती (Mahayuti) सरकारने काढलेला अध्यादेश देखील त्यांनी भर सभेत फाडला. तसेच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी जरांगे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात दंड देखील थोपाटले आहेत. लक्ष्मण हाके यातून वेगवेगळी विधानं करत आहेत. त्यांच्या आक्रमक भाषेमुळे ते अडचणी देखील सापडले आहे. त्यांच्याविरोधात बीडमध्ये वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत.

Chhagan Bhujbal Beed
Ahilyanagar Municipal Corporation ward structure : महापालिका निवडणुकीसाठी 'वोट चोरी' पेक्षाही भयानक षडयंत्र; शिवसेना ठाकरे पक्षाच्या आरोपानं खळबळ

ओबीसी आरक्षणासाठी नेते मंत्री छगन भुजबळ देखील मैदानात संपूर्ण ताकदीने उतरत असल्याचे संकेत लक्ष्मण हाकेंनी दिले आहे. यासाठी राज्यभर दौरे सुरू आहेत. मंत्री भुजबळांनी देखील ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयात चार ते पाच याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Chhagan Bhujbal Beed
Maharashtra local body polls : 'बंड'खोरांच्या वादळात महायुतीची परीक्षा; स्थानिक निवडणुकीत विरोधकांना सुटणार घाम

जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून काढून घेतलेल्या अध्यादेशाविरोधात ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, बीडमध्ये ओबीसींचा 28 सप्टेंबरला महाल्गार मेळावा घेण्याचे ठरवले आहे. ओबीसी नेत तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित हा मेळावा होणार असल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली.

बीडमधील सभेला महाराष्ट्र मधील सर्व ओबीसी बांधव मोर्चा आणि रॅली त्यानंतर सभा होईल ओबीसी बांधव आता रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे. ज्या 59 लाख बोगस कुणबी करणाद्वारे मराठा बांधव हा मागास ठरत नाही आणि ते ओबीसी मध्ये घुसले आहेत त्यांच्या कुणबीर नोंदी रद्द कराव्यात या मागणीसाठी बीडमध्ये मोर्चाचे आयोजन.

लक्ष्मण हाके यांनी बीडमधील मोर्चाची माहिती दिली. ते म्हणाले, "बीडमधील 28 सप्टेंबरच्या महाएल्गार मोर्चाला राज्यभरातून ओबीसी बांधव येणार आहे. तो मोर्चा असेल, रॅली असेल आणि त्यानंतर सभा होईल." पश्चिम, उत्तर महाराष्ट्र, पुणे, सातारा, नांदेड सर्व महाराष्ट्र पिंजून काढत आहोत. उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पण आम्ही मुंबईला जाऊ, तेव्हा मुंबईतील प्रत्येक महामार्ग पॅक असेल, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.

'मराठा आरक्षणासंदर्भात महायुती सरकारने काढलेला अध्यादेश रद्द होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तसेच 59 लाख कुणबीकराद्वारे जो मराठा समाज बांधव, सामाजिक मागास ठरत नाही, त्या रद्द कराव्यात,' अशा प्रमुख दोन मागण्या या महाएल्गार मोर्चाद्वारे असणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com