सरकारने गुपचूप आजच्यासारखे आमच्यासोबत राहायचे. मराठ्याच्या पोरांना नोटीस दिली तर आम्हीही गनिमीकावा करू. मराठ्यांना अडवणे एवढं सोपं नाही. आरक्षण द्या, सगळे गुन्हे मागे घ्या, सारथीला वाढीव बजेट द्या, महामंडळाला बजेट द्या, रेंगाळलेल्या नियुक्त्या द्या, सर्व वसतिगृह सुरू करा, असे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले.
मराठ्यांना आता देव आडवा आला तरी आरक्षण घेऊनच मुंबईतून परत फिरणार आहे. मराठ्यांनी मुंबईकडे कूच केले तर माघारी फिरणार नाही. ट्रॅक्टर अडवून दाखवा, मग बघतो. मुंबईत त्रास दिला तर महिलांनी आमदार, खासदारांच्या दारासमोर जाऊन बसा, असा आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.
मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्री तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मराठा समाजातील लेकरांच्या मागे उभे राहा. उद्यापासून जर मागे उभे राहिला नाही, तर मराठा समाजाच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी बंद राहील. पुढील काळात त्यांना दारातही उभे करायचे नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
उपोषणाच्या ठिकाणी मराठे मला भेटायला येणार. तिथे जनसागर उसळणार असल्याचे सांगत जरांगे यांनी राज्यभरातील मराठा समाजाला मुंबईत येण्याचे आवाहन केले. मुंबईत शांततेत येण्याचे आवाहनही त्यांनी केले. आता मराठे घरी राहणार नाहीत. मुंबईत जो हिंसा करेल तो आपला नाही. कुणी गाडी पेटवली तर त्याला आपणचं पकडून द्यायचे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
आपल्याला त्यांनी नोटिसा दिल्या. मुंबईत 144 कलम लागू केले. 18 तारखेपर्यंत हे कलम लागू केले आहे. आता त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानात 20 जानेवारीपासून करणार, अशी जरांगे यांनी मोठी घोषणा केली.
मराठा समाजाला आता डिवचू नका. तुम्ही अंतरवालीचा प्रयोग केला. पुन्हा यात पडू नका. त्यांनी पुन्हा एक डाव रचला. नोटिसा दिल्या. ट्रॅक्टर घेऊन कुठे जाऊ नका. आता आरक्षण हिसकावून आणणार. आंदोलन करायचे पण शांततेत. शब्द पाळायचा, मोडायचा नाही. आम्ही किती दिवस सहन करायचे. आधी तीन महिने नंतर 40 दिवसांचा वेळ घेतला. आम्हाला काही मर्यादा आहेत, भावना आहेत. आता किती दिवस दम काढणार, असे जरांगे यांनी नमूद केले.
जो आपल्या लेकराच्या पाठिशी उभा राहील, तोच आपला नेता. फक्त आपली मते घेण्यासाठी आला तर त्याला चपलाने मारायचे. आता माघार नाही. आमच्या जीवावर मोठे होता आणि पडणारे मुडदे बघता. जातीपेक्षा कुठलाही नेता मोठा नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
मला ते शत्रू मानायला लागले आहेत. मराठ्यांचे एकही बलिदान वाया जावू द्यायचे नाही. सरकार मराठ्यांचा अपमान करत आहे. त्यांची फसवणूक करत आहे. मराठ्यांनी ह्यांना मोठं करायचं आणि मराठ्यांच्या पोरांचे मुडदे पडत असताना त्यांच्याकडे बघायचं नाही. आता सावध व्हा. आपल्या लेकरांचे बळी जाऊ द्यायचे नाही. सरकार गांभीर्याने घेत नाही. सरकारला वठणीवर आणेपर्यंत माघार घ्यायची नाही, असे जरांगे म्हणाले.
मी मॅनेज होत नाही हा सरकारचा प्रॉब्लेम आहे. मी काहीही चुकीचं करत नाही. माझं आणि पैशांचं जमत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळण्याची एवढीच संधी आहे. त्याचं सोनं करा. मराठ्यांना आरक्षण मिळणार हे नक्की. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार, असेही जरांगे यांनी पुन्हा ठामपणे सांगितले.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आमची सगळ्यांची वेदना आता एकच आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्या एकट्याचे ऐकून जर निर्णय घेतला तर जड जाईल. मोठ्या राज्यातील मोठी जात संपण्याचा तुम्ही घाट घातल्याचे दिसायला लागले आहे. हा समाज खवळला तर शांततेत तुमचा सुफडा साफ होईल. राजकीय अस्तित्वाचा सुफडा साफ होईल, असा इशारा जरांगे यांनी दिला.
मराठा आरक्षणाविरोधात बोलल्यास त्याला सुट्टी नाही, मग ते कुणीही असुद्यात, असे म्हणत जरांगे यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांनाही इशारा दिला.
छगन भुजबळ यांच्यावर जरांगे यांनी जोरदार टीका केली. सध्या ते पिशवीच घेऊन फिरतात. त्यात कागदपत्रे घेऊन फिरतात. येवल्याचा येडपट, बुजगावणं, डबडं म्हणत हल्लाबोल केला. आम्ही गप्प बसलो की काड्या करतात.
गर्दीचा महाप्रलय म्हणत जरांगे नतमस्तक झाले. सुरूवातीलाच छगन भुजबळ यांचे नाव न घेता खोचक टीका केली. येवल्याचा येडपट असा उल्लेख केला. हॉटेल जाळल्याचा खोटा आरोप लावला. आपल्या निष्पाप पोरांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचाही आरोप केला.
मनोज जरांगे व्यासपीठावर दाखल झाल्यानंतर उपस्थितांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
मनोज जरांगे यांच्या बीडमधील सभेला तुफान गर्दी झाली होती. 24 डिसेंबर डेडलाईन असल्याने ते काय बोलणार, सरकारला कोणता इशारा देणार, याची सर्वांना उत्सुकता लागली होती.
बीड शहरात सभा सुरू होण्यापुर्वी जरांगे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बीड शहरातून जरांगेची रॅली निघाली त्यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. जेसीबीतून जरांगे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 24 डिसेंबरची रोजी मुदत संपत आहे. यामुळे आता एक तर मराठा आरक्षण द्या, नाहीतर राज्यभर पुन्हा आंदोलनाचा भडका उडेल, अशा इशारा जरांगेंनी दिला आहे. बीडमधील सभेला इशारा सभा असं नाव दिलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.