Raosaheb Danve News : विदर्भातल्या मुली लग्न करून आमच्याकडे निवडणूक लढवतात , आता आम्हालाही ओबीसीत घ्या..

BJP News : तुमच्या मुली आमच्याकडे लग्न करून येतात आणि ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवतात.
Raosaheb Danve News
Raosaheb Danve News Sarkarnama

Maratha Reservation News : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष भडकला आहे. रोज नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप टीका करतांना दिसत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मात्र ओबीसी विरुद्ध मराठा या वादावर मिश्किल भाष्य करत वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. (Raosaheb Danve News) जुन्या काळातील लोकांकडून काही चुका झाल्या असतील, नोंदी चुकल्या असतील पण आम्ही ओबीसीच आहोत, आता आम्हाला तुमच्यात घ्या, असे म्हणत जोरदार टोलेबाजी केली.

Raosaheb Danve News
Vijay Wadettiwar News : तर देशाचे दोन तुकडे झाले असते ; वडेट्टीवार असं का म्हणाले ?

निमित्त होते बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी अरुण मापारी परिवाराच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमाचे. (Maratha Reservation) छत्रपती संभाजीनगरात मापारी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशांकरीता दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. शिंदे गटाचे बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दानवे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात मराठा-ओबीसी वादावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. विर्दभातील मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसींचे आरक्षण मिळते. (OBC) परंतु मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी समजले जात नाही. त्यामुळे विदर्भा प्रमाणेच मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसींमधून आरक्षण या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर दानवे यांनी हा मुद्दा छेडला आणि आम्हालाही आता ओबीसीत घ्या, अशी मागणी केली. बुलडाणा आणि आम्ही सीमेवरचे आहोत. तुमच्या मुली आमच्याकडे लग्न करून येतात आणि ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवतात. पण त्यांच्या नवऱ्यांना मात्र ओबीसीतून निवडणूक लढवता येत नाही. जुन्या लोकांकडून काही चुका झाल्या असतील, नोंदी झाल्या नसतील, पण आता आम्हाला ओबीसीमध्ये घ्या, आम्ही ओबीसीच आहोत. त्यासाठीच सध्या लढा सुरु आहे आणि लवकरच आम्ही हे आरक्षण घेऊ, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला.

सध्याचे वातावरण पाहता फार बोलणे योग्य नाही, असा चिमटा काढत दानवे यांनी आपले भाषण आटोपते घेतले. सध्या आम्हाला कोणी बोलवत नाही, तुम्ही बोलवले त्याबद्दल आभार, असा टोलाही त्यांनी आयोजकांना लगावला. मराठा आंदोलकांनी लावलेले गावबंदीचे पोस्टर दानवे यांच्या भोकरदन तालुक्यातील गावात फाडल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी या मुद्यावरून दानवे पिता-पुत्रांना लक्ष्यही केले होते. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी जरांगेंच्या मागणीला पाठिंबा दर्शवत आपल्याबद्दलचा रोष कमी करण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून आले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com