MP Imtiaz Jaleel News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात फूट पाडू पाहणाऱ्या नेत्यांना आवरा...

AIMIM News : मला भीती वाटते की आताच नियंत्रण न केल्यास याला वाईट वळण लागू शकते.
MP Imtiaz Jaleel News
MP Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकू पाहत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सभा घेणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसींचे नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (MP Imtiaz Jaleel News) या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी एक भीती व्यक्त केली आहे.

MP Imtiaz Jaleel News
Sambhajinagar Loksabha Constituency : छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिंदे- फडणवीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार?

आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती-जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काही राजकीय नेते करू पाहत आहेत. (Maratha Reservation) त्यांना वेळीच आवरा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा इम्तियाज यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील आरक्षणाचे राजकारण जातीय आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहे. (Imtiaz Jaleel) विविध राजकीय पक्षांचे काही मोठे नेते आपापल्या जातीच्या लोकांना भडकावण्यासाठी सरसावताना दिसत आहेत.

मला भीती वाटते की आताच नियंत्रण न केल्यास याला वाईट वळण लागू शकते, अशी शंका इम्तियाज यांनी व्यक्त केली आहे. (Marathwada) अंबड तालुक्यात काल झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात नेत्यांची आक्रमक भाषणं झाली. विशेषतः राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर वातावरण तापले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी केलेले दावे, आरोप, टीका या सगळ्यांना भुजबळ यांनी आपल्या शैलीत उत्तरे दिली. वैयक्तिक टीका करतानाच भुजबळ यांनी राज्य सरकार, गृहखाते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थितीत केले. जरांगे यांना उद्देशून केलेल्या टीकेनंतर भुजबळांना प्रत्युत्तर दिले जात आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असे स्वरूप आता या आंदोलनाला येऊ लागले आहे. गावबंदीचे बॅनर, अंतरवाली सराटी येथे झालेल्या पोलिस हल्ल्यावरून भुजबळांनी केलेली टीका आणि जशासतसे उत्तर देण्याची भाषा याचे पडसाद येणाऱ्या काळात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच अनुषंगाने एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही त्यांच्या मनात असलेली भीती बोलून दाखवली आहे. लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना आवरा, असे आवाहनही इम्तियाज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे नेते समाजाला फक्त झुलवत ठेवतील, असा आरोपही इम्तियाज यांनी केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com