धनंजय शेटे
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाची सर्वच राजकीय नेत्यांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे. मराठा समाज आक्रमक होत, सर्वपक्षीय नेत्यांना गावागावांत प्रवेशबंदी केली जात आहे. राज्यभरात विविध गावांमध्ये साखळी उपोषण करण्यात सुरू आहे. यादरम्यान एका अनोख्या आंदोलनाची माहिती समोर येत आहे. पाच मराठा तरुणांनी उंच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे, आरक्षण जाहीर होणार नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील पाच तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मोबाईल नेटवर्कच्या टॉवरवर चढलेले असून, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
स्वप्निल ज्ञानोबा नाईकनवरे, गौरव आप्पा नाईकनवरे, अभिमान शहाजी भोसले, दत्ता अर्जुन इंदलकर, बालाजी राजाभाऊ रांजवण असे टॉवरवर चढून आंदोलन करणाऱ्या या पाच तरुणांची नावे आहेत. पाटसांगवी गावातील सकल मराठा समाज व पोलिसांच्या वतीने तरुणांनी या वेळी टॉवरवरून खाली उतरावे, अशी विनंती त्यांना केली आहे. मात्र, त्यांनी खाली उतरण्यास नकार दिला.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण जाहीर होणार नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरू राहणार आहे. आपण खाली उतरणार नाही, अशी ठाम भूमिका या पाच तरुणांनी घेतली आहे. या वेळी महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी आंदोलन न करता, युवकांना खाली उतरण्याची साद घातली, परंतु या पाच तरुणांनी त्यांच्या या विनंतीला फेटाळून लावले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.