Maratha Reservation : आत्मदहन करण्याचा तरुणाचा प्रयत्न, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना

Maratha Reservation Protest Manoj Jarange Patil Uposhan : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होत असून, आंदोलकांचा संयम सुटत चालला आहे.
Maratha Reservation Protest
Maratha Reservation ProtestSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Maratha Reservation Protest
Pratap Patil : मराठा आंदोलकांनी खासदार प्रताप पाटलांच्या गाड्या फोडल्या!

एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. दुसरीकडे एका मराठा तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अतिश गरड असं या तरुणाचं नाव आहे. सतर्क असलेल्या पोलिसांनी वेळीच त्या तरुणाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

परभणीमध्ये सुरू असलेल्या धरणे आंदोलनामध्ये संतप्त एका तरुणाने दोन दिवसांपूर्वी आपली नस कापून घेतल्याचा प्रकार घडला होता. यानंतर सकल मराठा समाजाकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. आंदोलनामध्ये अशा प्रकारे स्वतःच्या जिवाशी खेळू नका, आंदोलन शांततेत सुरू ठेवा, असं सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com