Marathwada divisional commissioner : आता मारावे लागणार नाहीत खेटे; निवेदन स्वीकारण्यासाठी दहा अधिकारी नियुक्त...

Sambhajinagar News : कार्यालयातील यंत्रणेकडे प्राप्त निवेदनांवर निवेदकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार.
divisional commissioner News
divisional commissioner NewsSarkarnama
Published on
Updated on

Administraion News : `सरकारी काम अन् चार महिने थांब` ही प्रतिमा पुसण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी एक नवा उपक्रम सुरू केला आहे. (Chhatrapati Sambhajinagar News) त्यानुसार आता विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या कामांचे निवेदन घेऊन अधिकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी फिरण्याची आवश्यकता भासणार नाही. विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विविध विभागांच्या कामांची निवेदनं स्वीकारण्यासाठी दहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

divisional commissioner News
Nanded Loksabha Constituency : पाळजचा गणपती कोणाला पावणार ?...

विभागीय आयुक्त कार्यालयातील (Marathwada) कामाची व्यापकता लक्षात घेत निवेदने स्वीकारणे, निवेदक व शिष्टमंडळे यांच्याशी चर्चा करणे, यामध्ये अधिक सुसूत्रता व सुटसुटीतपणा आणण्यासोबतच वेळेची बचत व प्रश्नांना न्याय देण्यासाठी यामध्ये बदल करण्यात आला आहे. (commissioner) विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदनं स्वीकारण्यासाठी विविध विषयांशी संबंधित १० अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

अतिरिक्त आयुक्त-१ हे विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित सर्व निवेदने स्वीकारतील. (Maharashtra) उपायुक्त (महसूल) हे महसूल विभागाविषयी, कनिष्ठ महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्याविषयी, गौणखनिज, इनाम, कूळ, अतिक्रमणे, गावठाण विस्तार, धार्मिक, सीलिंग इत्यादी बाबतीत सर्व निवेदने स्वीकारतील.

उपायुक्त (पुरवठा) हे अन्न व नागरी पुरवठा विषयांची सर्व निवेदने स्वीकारतील. उपायुक्त (पुनर्वसन) हे पुनर्वसन व भूसंपादन विषयांवर निवेदने स्वीकारतील. उपायुक्त (आस्थापना) हे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतविषयक सर्व निवेदने स्वीकारतील. उपायुक्त (नियोजन) हे वित्त व नियोजन विषयावरील सर्व निवेदने स्वीकारतील, तर सहायक आयुक्त (मावक) हे नाहस, रोस्टर, अज, अजा अन्याय याबाबतीत सर्व निवेदने स्वीकारतील.

कार्यालयातील यंत्रणेकडे प्राप्त निवेदनांवर निवेदकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. निवेदनाबाबत केलेल्या कार्यवाहीसंदर्भात निवेदक यांना लेखी कळविण्यात येणार आहे. नियुक्त अधिकाऱ्यांच्या अनुमतीशिवाय निवेदन देणाऱ्यास कॅमेरा, मोबाईलचा वापर करता येणार नाही. निवेदनाबाबतीत माहिती वेळोवेळी विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात येणार आहे.

divisional commissioner News
Maratha Reservation : गावागावांत आमदार, खासदारांना गावबंदी; फलक ठरताहेत लक्षवेधी...

उपायुक्त (सामान्य) हे पोलिस कायदा व सुरक्षा, सर्व बैठका, विभागीय आयुक्तालयाबाबत सर्व निवेदने तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांना प्राधिकृत न केलेल्या सर्व विषयांची निवेदने स्वीकारतील. तसेच उपायुक्त (नगरपालिका प्रशासन) हे नगरपालिका प्रशासन, महानगरपालिकाबाबतचे सर्व निवेदने स्वीकारतील. उपायुक्त (रोहयो) हे रोजगार हमी योजना व पाणीटंचाई बाबतीत सर्व निवेदने स्वीकारतील.

एखाद्या निवेदनात एकापेक्षा अधिक शाखांचे विषय असल्यास ते निवेदन आलेल्या निवेदनात पहिल्या विषयासंबंधित अधिकारी स्वीकारणार आहेत व इतर विषयांबाबत संबंधित शाखांना कार्यवाहीसाठी प्रत देणार आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी विविध मागण्यांसाठी मोर्चे काढले होते. परंतु संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी समोर यावे, अशी मागणी करत काही आंदोलकांनी पोलिसांचे सुरक्षा कडे भेदत पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने ही नवी यंत्रणा उभी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com