Marathwada : शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल तर सरकारने दिवाळखोरी जाहीर करावी..

सरकारमधील अनिश्चिततेच्या वातावरणामुळे शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ असू शकतात. त्यामुळे ते परत जाण्याच्या मानसिकतेत असतील हे देखील नाकारता येणार नाही. (Balasaheb Thorat)
Congress Leader Balasaheb Thorat News, Aurangabad
Congress Leader Balasaheb Thorat News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : अतिवृष्टी, सततचा आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओल्या दुष्काळाची मागणी होत असतांना सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. पीकांच्या नुकसानीचे पंचनामे अजून झालेले नाहीत, सरकारमधील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जायला घाबरत आहेत. शेतकऱ्यांना मदत करायला सरकारकडे पैसे नाही असे सांगितले जाते. मग एकदा सरकारने दिवाळखोरी जाहीर करून टाकावी, असा टोला काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

Congress Leader Balasaheb Thorat News, Aurangabad
Marathwada : `भारत जोडो`च्या निमित्ताने नांदेड लोकसभेसाठी चव्हाणांना बळ देण्याचा प्रयत्न..

औरंगाबादेत भारत जोडो यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत थोरातांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. (Congress) राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीच्या वाऱ्याकरूनच थकून जातात, त्यांचे कोणी ऐकतच नाही, असे (Balasaheb Thorat) थोरात म्हणाले.

राज्यातील सरकार कसे आले, मंत्रीमंडळ विस्तार, खाते वाटप आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या कशा पद्धतीने झाल्या हे जनतेने नीट पाहिले आहे. सरकारमध्ये सगळे काही अलबेल नाही, शिंदे गटातील आमदार अस्वस्थ असून ते परत उद्धव ठाकरेंकडे जाण्याच्या देखील चर्चा समोर येत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात म्हणाले, सरकारमधील अनिश्चिततेच्या वातावरणामुळे शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ असू शकतात. त्यामुळे ते परत जाण्याच्या मानसिकतेत असतील हे देखील नाकारता येणार नाही. मुळात राज्यातील सरकार कसे चालले आहे हे शेतकरी आणि सर्वसामान्य लोक पाहत आहेत.

हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मदत करण्यात आणि पीक विमा मिळवून देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. अद्याप नुकसानीचे पंचनामे नाहीत, त्यामुळे कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावे असा प्रश्न सरकारमधील मंत्र्यांना पडला आहे. मदतीसाठी सरकारकडे पैसे नाहीत असेही बोलले जाते.

हे खरं असेल तर सरकारने एकदा तसे जाहीर तरी करून टाकावे, म्हणजे शेतकरी देखील म्हणेल सरकारकडे पैसेच नाही तर त्यांचा देखील नाईलाज आहे. पण ही बाब योग्य नाही, ना सरकारी मदत ना पीक विम्याचे पैसै, अशा परिस्थितीत शेतकरी भरडला जात असतांना सरकारी पातळीवर काहीच हालचाली होत नाही हे दुर्दैवी असल्याचेही थोरात म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com