Marathwada Graduate Constituency News : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजप मित्रपक्ष राष्ट्रवादीशीच दोन हात करणार ? संजय केनेकर यांच्यावर मोठी जबाबदारी

In the Marathwada Graduate Constituency, BJP is set to take on the NCP alliance. : 2008 च्या निवडणुकीत आणि त्यानंतर 2014, 2020 मध्ये विद्यमान मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी एकदा श्रीकांत जोशी आणि दोनवेळा शिरीष बोराळकर यांचा पराभव केला.
Marathwada Graduate Constituency News
Marathwada Graduate Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP News : मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर सुरुवातीपासून वर्चस्व कायम राखणाऱ्या भाजपला गेल्या 18 वर्षापासून या मतदारसंघावर पुन्हा आपली पकड मजबूत करता आलेली नाही. माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी या भाजपच्या नेत्यांनी यापूर्वी मराठवाडा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र 2008 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सतीश चव्हाण यांनी या मतदार संघातून विजय मिळवत राष्ट्रवादीचा झेंडा कायम फडकवत ठेवला.

आगामी 2026 च्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला सामोरे जात असताना राज्याच्या सत्तेत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) विरोधात भाजपा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पदवीधर मतदार संघ खेचून आणण्यासाठी भाजपने विधान परिषदेतील आमदार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या संजय केनेकर यांच्यावर मतदार नोंदणी प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असला तरी पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी ही निर्णायक ठरत आली आहे.

सुरुवातीला भाजपची मतदार नोंदणीवर पकड होती, मात्र कालांतराने ती सुटली. 2008 च्या निवडणुकीत आणि त्यानंतर 2014, 2020 मध्ये विद्यमान मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी एकदा श्रीकांत जोशी आणि दोनवेळा शिरीष बोराळकर यांचा पराभव केला. (BJP) विजयाची हॅट्रिक करत सतीश चव्हाण यांनी पदवीधर मतदार संघातील आपणच हुकूमाचे 'एक्के' आहोत हे दाखवून दिले होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्याचा मराठवाड्यातील विस्तार ही सतीश चव्हाण यांच्या जमेची बाजू समजली जाते. या जोरावरच आतापर्यंत तीनवेळा त्यांनी या मतदारसंघात बाजी मारली होती.

Marathwada Graduate Constituency News
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ खेचून आणण्यासाठी भाजपचे दिग्गज मैदानात..

राष्ट्रवादी काँग्रेस कडून चौथ्यांदा त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध पाहता सतीश चव्हाण यांची उमेदवारी कापल्या जाण्याची शक्यता अगदीच कमी आहे. पक्षाकडे त्यांच्या तोडीस दुसरा उमेदवार नसल्याने सतीश चव्हाण यांच्या गळ्यात चौथ्यांदा उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे भाजपाकडून मात्र यावेळी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते.

Marathwada Graduate Constituency News
Satish Chavan News : मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावरच जिल्हाध्यक्षपदीचीही जबाबदारी!

भाजप धक्का देणार..

शिरीष बोराळकर हे दोनवेळा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावरच भाजपा डाव लावण्याची शक्यता नाही. संघटनात्मक बांधणीत सुद्धा पक्षाने त्यांच्या ऐवजी किशोर शितोळे या नव्या चेहऱ्याला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे कदाचित पक्षाकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध असलेला भाजपकडून ऐनवेळी नवा चेहरा देऊन विरोधकांपुढे आव्हान उभे केले जाऊ शकते.

Marathwada Graduate Constituency News
Prashant Bamb : प्रशांत बंबांचा शिक्षकांवर पुन्हा हल्लाबोल; ‘साठ हजारांपासून दीड लाखापर्यंत गलेलठ्ठ पगार घेतात; पण कर्तव्य चोख बजावत नाहीत’

राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असला तरी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये भाजपाच्या उमेदवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न या मित्रपक्षांकडूनच झाला होता. गंगापूर- खुलताबाद विधानसभा मतदारसंघ हे त्याचे उदाहरण म्हणावे लागेल. भाजपच्या प्रशांत बंब यांच्या विरोधात लढण्यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी चक्क पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी घेत निवडणूक लढवली होती.

Marathwada Graduate Constituency News
BJP Politic's : विधानसभेला आयात केलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजपने बनविले किसान मोर्चाचे अध्यक्ष

मात्र मुरब्बी प्रशांत बंब यांनी सतीश चव्हाण यांचे हे पार्सल परत पाठवले होते. मात्र चव्हाण यांच्या उमेदवारीने बंब यांची मतदार संघात चांगलीच दमछाक झाली होती. बंब हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक मधील आमदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीला घेरण्यासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आमदार संजय केनेकर यांच्यावर मतदार नोंदणी प्रमुखाची जबाबदारी सोपवत मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामाला लावले आहे. भाजपच्या या खेळीला अजित पवार आणि मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण कसे उत्तर देतात? यावर पुढील गणित अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com