Local Body Election 2025 : मराठवाड्यातील 49 नगर परिषदा अन् चार नगर पंचायतीमध्ये उडणार धुराळा!

Marathwada Local Body Election : नगराध्यक्ष पदासाठी मात्र मंत्री, आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींची मुलं, भाऊ, वहिणी, बायको अशांचीच वर्णी लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
Marathwada Local Body Election 2025
Marathwada Local Body Election 2025Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मराठवाडा विभागातील ४९ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे.

  2. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये थेट सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  3. प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी उमेदवारी अर्ज आणि पक्षनिष्ठेच्या चर्चांना सुरुवात केली आहे.

Marathwada Political News : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला. सर्वच राजकीय पक्षांनी घोषणा होण्याआधीच तयारी सुरू केली होती. मराठवाड्यातील 49 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींचा यात समावेश आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता पुढील महिनाभर अक्षरशः धुराळा उडणार आहे.

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, असे म्हणत राज्यातील सर्वच नेत्यांनी झोकून देवून काम करणार असल्याची ग्वाही दली. महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, असे म्हणत प्रोत्साहित केले.

प्रत्यक्षात मात्र नगराध्यक्ष पदासाठी मात्र मंत्री, आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींची मुलं, भाऊ, वहिणी, बायको अशांचीच वर्णी लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेचेच दुसरे आमदार संतोष बांगर यांनी स्वतःच्या वहिणीची तर भाजपाचे हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनीही जिल्हा परिषदेसाठी मुलाची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे.

Marathwada Local Body Election 2025
Election Commission: निवडणूक आयोगाचा एकच निर्णय अन् राज ठाकरेंसह 'मविआ'नं पूर्ण ताकदीनिशी टाकलेला डाव फसला

एकीकडे नेते ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, म्हणून भाषणबाजी करतात. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी मात्र घराणेशाही करत सगळी पद आपल्याच घरात असली पाहिजे यासाठी शक्तीपणाला लावत आहेत. हे चित्र मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये असल्याने कार्यकर्तांमध्ये आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या का? अशा भावना निर्माण होत आहेत.

Marathwada Local Body Election 2025
Local Body Elections update : 'स्थानिक'च्या निवडणुकांसाठी आयोग सज्ज; विरोधकांना झटका बसणार, 'ती' मागणी राहणार कागदावरच...

मराठवाड्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायती

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगर परिषदा : ६

१. गंगापूर

२. कन्नड

३. खुल्ताबाद

४. पैठण

५. वैजापूर

६. सिल्लोड

जालना जिल्हा नगर परिषदा : ३

१. परतूर

२. भोकरदन

३. अंबड

नांदेड जिल्हा नगर परिषद: १२

१. भोकर

२. धर्माबाद

३. उमरी

४. बिलोली

५. कुंडलवाडी

६. देगलूर

७. कंधार

८. लोहा

९. हदगाव

१०. किनवट

११. मुदखेड

१२. मुखेड

लातूर जिल्हा नगर परिषद : ४

१. औसा

२. उदगीर

३. अहमदपूर

४. निलंगा

हिंगोली नगर परिषद : ३

१. हिंगोली

२. वसमत

३. कळमनुरी

परभणी नगर परिषद :- ७

१. जिंतूर

२. पाथरी

३. मानवत

४. पूर्णा

५. गंगाखेड

६. सेलू

७. सोनपेठ

बीड जिल्ह्यातील नगर परिषदा : ६

१. अंबाजोगाई

२.परळी

३. माजलगाव

४. धारूर

५. बीड

६. गेवराई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगर पंचायत : १

१. फुलंब्री

नांदेड जिल्ह्यातील एकूण नगर पंचायत:- ४

१. हिमायतनगर

लातूर जिल्ह्यातील नगर पंचायत : १

१. रेणापूर

परभणी जिल्ह्यातील नगर पंचायत : १

१. पालम

FAQs

Q1. मराठवाड्यात किती नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत?
➡️ एकूण ४९ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

Q2. या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे का?
➡️ हो तारीख जाहीर झाली असून निवडणूक आयोगाने वेळापत्रक घोषित केले आहे.

Q3. कोणते प्रमुख राजकीय पक्ष या निवडणुकीत उतरतील?
➡️ भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष असतील.

Q4. मराठवाड्यात कोणते जिल्हे या निवडणुकीत सामील आहेत?
➡️ बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, जालना, हिंगोली आणि संभाजीनगर हे आठ जिल्हे आहेत.

Q5. या निवडणुकांमधून काय परिणाम अपेक्षित आहेत?
➡️ स्थानिक स्तरावर सत्तांतराची शक्यता असून, आगामी विधानसभेसाठी ही निवडणूक राजकीय चाचणी ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com