Tuljapur Assembly Election : राणा पाटील यांच्याकडे विकासाची दृष्टी : नितीन गडकरी

Tuljapur Assembly Election : आम्ही दिलेल्या योजना, केलेली विकासकामे ही जात धर्म ठरवून नाही तर सर्वांसाठी दिली
 Rana Patil
Rana PatilSarkarnama
Published on
Updated on

Tuljapur Assembly Election : तुळजापूर विधानसभेची निवडणूक ही तुमचं म्हणजे सामान्य नागरिकांच भविष्य ठरवेल. जात, धर्म न पाहता विकासासाठी मतदान करा. जो तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास करेल, शेतकऱ्यांचा, तरुणांचा प्रश्न सोडवेल, रस्त्याचे जाळे निर्माण करेल, अशा राणाजगजितसिंह पाटील यांना विजयी करा.

तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर हे एक चांगले तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. विकासाची दृष्टी असलेल्या आमदार पाटील यांना विजयी करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नळदुर्ग येथील प्रचार सभेत गुरुवार (ता. १४) रोजी केले.

सुरवातीला धाराशिव जिल्ह्यासाठी बनवलेल्या संकल्पपत्राचे गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तुळजापूर ते नळदुर्ग या मार्गास मंजुरी मिळली आहे. लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरवात होईल.

महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांना जोडण्याचे भाग्य मला मंत्री म्हणून लाभले, नळदुर्ग ते अक्कलकोट या मार्गावरील शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेत मावेजाची मागणी केली आहे. त्यासाठी ६६ कोटी रुपये शेतकऱ्यांना मावेजापोटी देणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. आमदार पाटील यांनी याप्रकरणी निवेदनाद्वारे मागणी केली होती.

 Rana Patil
Majalgaon Assembly Election : आमदार सोळंके यांच्याकडेच माजलगावच्या विकासाची दृष्टी -डाॅ. प्रकाश आनंदगावकर

धाराशिव जिल्ह्यात सहा हजार कोटींची कामे माझ्या खात्याकडून होत आहेत. यापैकी ११ कामे पूर्ण, तर १३ कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी जिल्ह्यात १९७ किलोमीटर रस्त्याची लांबी होती. मात्र, मागील दहा वर्षांत माझ्या काळात हा आकडा ४१८ किलोमीटरपर्यंत वाढल्याचे गडकरी म्हणाले.

आम्ही दिलेल्या योजना, केलेली विकासकामे ही जात धर्म ठरवून नाही तर सर्वांसाठी दिली, असे सांगताना विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हचा त्यांनी समाचार घेतला. या सभेस भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) महेंद्र धुरगुडे, भाजपचे मिलिंद पाटील, सुनील चव्हाण, अर्चना पाटील, अस्मिता कांबळे, आरपीआयचे (आठवले गट) राजाभाऊ ओव्हळ, शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजपाचे सुशांत भूमकर, संजय बताले, नय्यर जहागीरदार, धिमाजी घुगे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com