Marathwada Teacher Constituency Result : अडीच हजार मतं बाद, गुरुजींनी केली उमेदवारांची `शाळा`..

Teacher : एकच मिशन जुनी पेन्शन, नो पेन्शन नो वोट, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, विना अनुदानित शाळांना अनुदान द्या.
Marathwada Teachers Constituency Election News
Marathwada Teachers Constituency Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचे मतदार हे उच्चशिक्षत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून मतदान करतांना चुका होणे अपेक्षित नसते. ( Marathwada Teacher Constituency Result) शिवाय निवडणुक विभागाकडून मतदान कसे करावे या संदर्भात सुचना आणि नियम वारंवार सांगितले जातात. असे असले तरी या दोन्ही निवडणुकीत अवैध मतांचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून आले आहे.

Marathwada Teachers Constituency Election News
Marathwada Teacher Constituency Result : बंडखोर सोळुंके, कुलकर्णी यांना पक्षाने आणि मतदारांनीही जागा दाखवली..

आज औरंगाबाद (Aurangabad) विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत २ हजार ४८५ मते बाद झाली आहेत. उमेदवारांशी असलेले हितसंबंध जोपासण्यासाठी अशा प्रकारची `शाळा` शिक्षकांकडून केली जाते. (Teacher) पहिल्या पसंतीची मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर बाद मते जाहीर करण्यात आली. अनेक शिक्षकांनी मतदान करण्याऐवजी मतपत्रिकांवर शेरे लिहल्याचे समोर आले आहे.

अनेकांनी मत पत्रिकेवर पसंती क्रमांक टाकण्याऐवजी मतपत्रिकांवर मजकुर लिहून त्या भरवल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. या शिवाय एकच मिशन जुनी पेन्शन, नो पेन्शन नो वोट, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, विना अनुदानित शाळांना अनुदान द्या, प्रचलित नियमानुसार अनुदान द्या अशा मागण्या चक्क मतपत्रिकेवर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा मतपत्रिका बाद करण्यात आल्या.

निवडणुकीकच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांनी पहिल्या पसंतीची २० हजार ७८ मते घेऊन आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या स्थानावर शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांनी बाजी मारली असून त्यांना पहिल्या पसंतीची १३ हजार ५४३ मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या स्थानावर भाजपाचे किरण पाटील आहेत, त्यांना १३ हजार ४८९ पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत.

५३ हजार २५७ शिक्षकांनी मतदान केले होते, त्यापैकी २ हजार ४८५ मते बाद झाली आहेत. तर ५० हजार ७७१ मते वैध ठरली आहेत. त्यामुळे विजयासाठी २५ हजार ३८६ मतांचा कोटा ठरवण्यात आला. आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात येत आहे. दुसऱ्या पसंतीच्या मोजणीनंतरच विजयी कोण होणार हे स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com