Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीत भुमरे, बागडे, बंब यांचा लागणार कस..

Marathwada : राज्यात सत्तांतर झाले आणि जिल्ह्याला तीन मंत्री मिळाले. त्यामुळे यंदाच्या निवडणुका चुरशीच्या होणार.
Market Committee Election News
Market Committee Election News Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे डोळे लागून असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Market Committee) निवडणूकीचा बिगुल अखेर वाजला आहे. प्रशासक राज संपवून बाजर समित्यांचा कारभार आपल्या हाती घेण्यासाठी उत्सूक असणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचा कस या निमित्ताने लागणार आहे.

Market Committee Election News
Raosaheb Danve News : खासदार निधी कमी असला म्हणून काय झाले ? माझ्याकडे अलाउद्दीनचा चिराग..

विधानसभा मतदारसंघ तसेच जिल्ह्यातील राजकारणात बाजार समित्यांना आर्थिक दुष्ट्या अतिशय महत्व असते. (Haribhau Bagde) अनेक नव्यानेच राजकारणात दाखल झालेल्यांचे राजकारण हे या समित्यांच्या माधमातूनच फुलत असते. (Marathwada) कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, लासूर स्टेशन, पैठण, फुलंब्री, वैजापूर, कन्नड या सात बाजार समितीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे.

त्यानूसार २८ एप्रिलला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. २७ मार्चपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भात मतदारांची अंतीम यादीही प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी बुधवारी (ता.२२) दिली. स्थानिक राजकारणात महत्वाची भुमिका बजावणारी आणि शेतकऱ्यांशी थेट जोडणारी संस्था म्हणजे बाजार समिती.

या समित्या ताब्यात असणाऱ्या नेत्यांसाठी जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज संस्थामधील निवडणुका सोप्या होतात. त्यामुळे अगदी मंत्री देखील या निवडणुकांमध्ये जातीने लक्ष घालतात. नऊ महिन्यांपुर्वी राज्यात सत्तांतर झाले आणि जिल्ह्याला तीन मंत्री मिळाले. त्यामुळे यंदाच्या निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सात बाजार समितीपैकी सर्वांचे लक्ष हे छत्रपती संभाजीनगर, गंगापुर, लासूर, फुलंब्री बाजार समितीवर आहे. या ठिकणी मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे.

जिल्ह्यातील प्रमुख असलेली छत्रपती संभाजीनगरची बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतुत्वाखाली तयारी सुरु आहे. दुसरीकडे माजी आमदार,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे यांनीही त्यांना शह देण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. कोरोनानंतर अनेक बाजार समित्यांवर अशासकीय प्रशासक नेमेले होते, तर काही बाजार समित्यांच्या संचालकांना मुदतवाढ देण्यात आली होती.

Market Committee Election News
Gangapur Sugar Factory : गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर गंगापूर कारखान्यात पूजा, लवकरच होणार सुरू..

नव्याने निवडणूक झालेल्यांना ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांच्या सभासदांची नावेही अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. २७ मार्चपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याची तपासणी मतदारांनी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com