Nanded District Assembly Constituency : अमित देशमुख यांची महायुतीवर टीका, म्हणाले हे सरकार सर्वात भ्रष्ट

Amit Deshmukh's criticism, the grand coalition government is the most corrupt : भ्रष्टाचाराचा कळस या सरकारने गाठला. यात सर्वसामान्य शेतक-यांसाठीच्या शेततळे, विहीर, गायगोठ्यात यांचे हप्ते ठरलेले होते. राज्यात महाविकास आघाडीने मात्र जातीय सलोखा टिकवण्याचे काम सातत्याने केले आहे.
Amit Deshmukh Nande News
Amit Deshmukh Nande NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : मराठवाड्यात लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने जो कौल दिला आहे, त्या पेक्षा अधिक कौल यावेळी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळेल. शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यात जायकवाडी, विष्णुपुरी व येलदरी सारखे धरण उभे केले. यातून अनेक विकासाची कामे झाली, त्यानंतर मात्र अनेक वर्ष उलटून गेली पण या भागात काहीच करता आले नाही, अशी खंत काँग्रेसचे स्टार प्रचारक माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी (ता. 9) उमरी येथील जाहिर सभेतून त्यांनी राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याची टीकाही केली. (Mahavikas Aghadi) नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभेची निवडणूक ही नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक होणार आहे. महायुतीच्या काळात सामान्यावर अन्याय झाला आहे. आरक्षण, महागाई, बेरोजगारी अशा सर्वच विषयात महायुती अपयशी ठरली आहे.

महायुती सरकारला राज्यात जाती सलोखा राखता आलेला नाही. महमद पैगंबर, साईबाबा यांच्याबद्दल वाद निर्माण केला गेला. कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. भ्रष्टाचाराचा कळस या सरकारने गाठला. (Amit Deshmukh) यात सर्वसामान्य शेतक-यांसाठीच्या शेततळे, विहीर, गायगोठ्यात यांचे हप्ते ठरलेले होते. राज्यात महाविकास आघाडीने मात्र जातीय सलोखा टिकवण्याचे काम सातत्याने केले आहे. या पुढील काळात देखील असे काम केले जाणार, असल्याची ग्वाही, अमित देशमुख यांनी यावेळी दिली.

Amit Deshmukh Nande News
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचा आश्वासनांचा पाऊस; 'पंचसूत्री' जाहीर

नांदेड हा पुर्वीपासून कॉग्रेस पक्षाचा बाले किल्ला होता. शंकरराव चव्हाण यांनी तो वारसा पुढे चालवला, पण त्यांच्या पुढे हा वारसा चालू शकला नाही, अशा शब्दात देशमुख यांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका केली. राज्यात विकास कोण करु शकतो हे जनतेला चांगले माहित आहे. त्यामुळे या निवडणुकीत जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Amit Deshmukh Nande News
Congress Politics : काँग्रेस 'अ‍ॅक्शन मोड'वर बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता; राजेंद्र मुळक निलंबित

मागील काळी विलासराव देशमुख यांचे सरकार अल्प मतात होते. त्यावेळी या ठिकाण चे अपक्ष आमदार बाबासाहेब गोरठेकरांनी साथ दिली होती. त्या मोठ्या माणसाचे दर्शन करण्यासाठी मी येथे आलो आह. आघाडीचा धर्म पाळुन त्यांचे नातू शिरिषराव देशमुख गोरठेकर यांनी माघार घेतली, त्यांचे स्वागत करतो. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास शिरिषराव गोरठेकर यांना नक्कीच न्याय देण्याचे काम करू, असे आश्वासन अमित देशमुख यांनी दिले.

महायुती सरकार हे पक्ष फोडणे, आमदार विकत घेणे, भष्ट्राचार या शिवाय काहीच करू शकले नाही. राज्यात दलालाचा सुळसुळाट निर्माण झाला असून राज्यात महाविकास आघाडीच सर्वसामान्याला न्याय देऊ शकेल, असेही अमित देशमुख म्हणाले. लोकसभेचे उमेदवार प्रा. रविंद्र चव्हाण व नायगाव विधानसभेचे उमेदवार डॉ. मिनल खतगावकर यांना निवडून आणू असे गोरठेकराचे नातू शिरिषराव देशमुख गोरठेकर यांनी जाहीर सभेतून सांगितले.

पाच वर्षात विकासाच्या नावाखाली वसुली..

यावेळी भाजपचे गणेशराव पाटील करखेलीकर, राजीव पाटील बोळसेकर, पाडुरंग गळगे, गोविंद रामोड यासह अनेकांनी कॉग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माधवराव किन्हाळकर, प्रा. रविंद्र चव्हाण, डॉ. मिनल खतगावकर, शिरिषराव देशमुख गोरठेकर यांची भाषणे झाली. नायगाव मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार मिनल खतगावकर यांनी भाषणातुन विरोधी आमदारांवर मागील पाच वर्षाच्या काळात एकाधिकारशाही पणे वागल्याची टीका केली.

स्व:ताच्या पक्षातील कवळे गुरूजी सारख्या नेत्याना दुर केलेच, पण अनेकांना दुखावले. ज्या गोरठेकरांनी निवडुण दिले त्यांच्या विरोधातगी अपशब्द वापरले. पाच वर्षांत विकासाच्या नावाखाली टक्केवारी वसुल करून भष ट्राचाराने माया जमविला. मी निवडून आल्यानंतर मतदार संघात सुशिक्षितांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या भागात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या भागातील सिंचनाचे प्रलंबित प्रश्न असतील ते पुर्ण करण्याची ग्वाही, मिनल खतगावकर यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com