MP Imtiaz Jaleel : वेळ तुम्ही सांगा, तारीख तुमच्या सोयीची, जागा तुमच्या आवडीची... एकदा होऊन जाऊ दे!

Bhagwat Karad and Chandrakant Khaire : इम्तियाज जलील यांनी खैरे, कराड यांना का दिलं आव्हान?
Imtiaz Jaleel, Bhagwat Karad, Chandrakant Khaire
Imtiaz Jaleel, Bhagwat Karad, Chandrakant KhaireSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhjai Nagar Political News :

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड तसेच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना टार्गेट केले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप, एकही विकासकाम न केलेला खासदार, या शब्दांत खैरे-कराड जोडी इम्तियाज जलील यांच्यावर तुटून पडली आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनीही माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना खुले आव्हान दिले आहे.

Imtiaz Jaleel, Bhagwat Karad, Chandrakant Khaire
Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांना MIM अंतर्गतच विरोध; छत्रपती संभाजीनगरमध्ये चाललंय तरी काय?

MIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर भागवत कराड (Bhagwat Karad) आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी टीकेची झोड उठवल्यानंतर जलील यांनीही दोघांना थेट फिल्मी स्टाइल आव्हान दिले आहे. वेळ, तारीख, ठिकाण तुम्ही ठरवा. प्रसारमाध्यमांना बोलवा आणि एका व्यासपीठावर समोरासमोर होऊन जाऊ द्या, असे ओपन चॅलेंज (Open Challenge) इम्तियाज यांनी दिले आहे.

इम्तियाज जलील 2019 मध्ये औरंगाबादचे (आताचे छत्रपती संभाजीनगर) खासदार झाले. विरोधी पक्षाचे खासदार म्हणून त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या ट्रिपल इंजिन सरकारसह केंद्रातील मोदी सरकारचाही वेळोवेळी समाचार घेतला.

केंद्रांच्या योजना, पंतप्रधान घरकुल, आदर्श पतसंस्थेसह राज्यातील सहकारी बॅंकांमधील गैरव्यवहार या विरोधात इम्तियाज जलील यांनी रस्त्यावर आणि दिल्लीत संसदेत आवाज उठवला. लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय घेऊन केलेली आंदोलने, निदर्शने मोर्चे आणि मंत्रिमंडळ बैठकीवर दिलेली धडक ही त्यांची काही ठळक उदाहरणे म्हणावी लागतील. यातून त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी झगडणारा खासदार अशी प्रतिमा तयार केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इम्तियाज यांच्यावरील आरोप

जलील यांच्या जनमानसातील प्रतिमेमुळे सत्ताधारी भाजप-शिवसेना अस्वस्थ आहे आणि विरोधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा त्रास होत आहे. इम्तियाज यांच्या आंदोलनाला त्यांनी राजकारणासाठी लोकांच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर भ्रष्टाचार, शहरातील शांतता बिघडवण्याचाही आरोप खैरे-कराड जोडीने इम्तियाज जलील यांच्यावर वारंवार केले आहेत. यावर आतापर्यंत शांत बसलेले इम्तियाज आता आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) पाहता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.

चला सोक्षमोक्ष लावूया!

यातूनच त्यांनी डॉ. भागवत कराड, चंद्रकांत खैरे यांना माझ्यावर आरोप करता, पण तुम्ही मंत्री, खासदार म्हणून इतकी वर्षे काय केले? जिल्ह्याच्या विकासात तुमचे असे कोणते योगदान आहे? हे एकदा समोरासमोर येऊन जनतेला कळू द्या! माझी तयारी आहे, तुमची आहे का? वेळ, ठिकाण, दिवस तुम्ही ठरवा आणि एकदा होऊनच जाऊ द्या, दूध का दूध आणि पानी का पानी, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी कराड-खैरेंविरोधात दंड थोपटले आहेत.

(Edited by Avinash Chandane)

R

Imtiaz Jaleel, Bhagwat Karad, Chandrakant Khaire
Nanded Politics : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे 'एमआयएम'च्या पतंगाला नांदेडमध्ये हवा ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com