AIMIM Political News : मध्य प्रदेशात एमआयएम निवडणूक लढवणार; काँग्रेसचा खेळ बिघडवणार

Maharashtra News : समाजाला प्रतिनिधित्व देताना काँग्रेस नेतृत्वाने हात आखडता घेतला आहे.
AIMIM Political News
AIMIM Political NewsSarkarnama
Published on
Updated on

MP Imtiaz Jaleel News : देशातील पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. पैकी मध्य प्रदेशात काँग्रेसने फक्त दोन मुस्लिम उमेदवार दिल्याने एमआयएम चांगलीच संतापली आहे. (Madhya pradesh Election News) काँग्रेस पक्षाला फक्त मुसलमानांची मते हवी आहेत, त्यांचे प्रतिनिधित्व नको, असा आरोप करत एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी आता मध्य प्रदेशात निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले आहे.

AIMIM Political News
INDIA Bloc News : इंडिया आघाडीतही मतभिन्नता, विधानसभेला तेवढं सोपं नाही; पवारांचे मतभेदाच्या नेमक्या मुद्द्यांवर बोट

आधी एमआयएमने (AIMIM) या राज्यात निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अनेक विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाची लोक आणि मतदार संख्या इतरांपेक्षा अधिक असूनही तिथे मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आली नसल्याचा दावा इम्तियाज यांनी केला. (Maharashtra) २३० पैकी केवळ २ मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे एमआयएमने आक्रमक पवित्रा घेत निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी `एक्स`वर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. मध्य प्रदेशातील काही विधानसभा मतदारसंघ असे आहेत, जिथे ३० टक्के मुस्लिम समाज आहे. तरीही स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेस पक्षाने २३० पैकी फक्त दोन विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आम्ही मध्य प्रदेशात निवडणूक न लढवण्याचा निर्णय बदलत आहोत. आता आम्ही इथे निवडणुका लढवणार आहोत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसला मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यायचे नाही

मुस्लिम समाजावर काँग्रेसकडून होत असलेला अन्याय आम्ही उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. काँग्रेसला फक्त मुस्लिमांची मते पाहिजे आहेत, लोकसभा किंवा विधानसभेत त्यांचे प्रतिनिधित्व नको, अशी टीकाही इम्तियाज जलील यांनी केली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत एमआयएमने ज्या राज्यांमध्ये पक्षाची ताकद नाही, तिथे न लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु वर्षानुवर्षे मुस्लिम समाजाची मते घेऊन सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेससारख्या पक्षांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्वच द्यायचे नाही, असे ठरवल्याचे दिसते.

मध्य प्रदेशात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात असूनही तिथे या समाजाला प्रतिनिधित्व देताना काँग्रेस नेतृत्वाने हात आखडता घेतला आहे. मुस्लिमांवर हा अन्याय असल्याचे म्हणत एमआयएमने आता मध्य प्रदेशात निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एमआयएम मध्य प्रदेशात निवडणूक लढली तर याचा थेट फायदा भाजपला आणि फटका काँग्रेसला बसेल, असे बोलले जाते. १७ नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होईल.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com