Abdul Sattar News : मंत्री अब्दुल सत्तार यांना उच्च न्यायालयाचा आणखी एक दणका

Minister Abdul Sattar hit again by the High Court : मंत्री अब्दुल सत्त्तार यांना कोणतेही अधिकार व त्यांचे कार्यक्षेत्र नसताना कायद्याच्या तरतुदीच्या विरोधात त्यांनी अपिलात बेकायदेशीर आदेश पारित करून चौकशी अहवाल रद्द केल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
abdul sattar
abdul sattarSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad High Court News : छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील तब्बल 88 कोटीच्या भ्रष्टाचारा संदर्भातील चौकशी अहवाल रद्द करणाऱ्या पालकमंत्री तथा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाला स्थगिती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. किशोर सी. संत यांनी दिले. मंत्र्यानी पारित केलेले आदेश हे त्यांचे कार्यक्षेत्र नसतांना पारित केल्याचे प्रथमदर्शनी सिध्द होत असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात नमुद केले आहे.

छत्रपती संभाजीनगर उच्चतम् कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती राधाकिसन पठाडे यांच्या विरोधात ज्ञानेश्वर बाजीराव म्हसके यांनी पठाडे यांच्या कार्यकाळात केलेल्या 88 कोटी रूपयांच्या भ्रष्टचाराची व बेकायदेशीर खर्चाची तक्रार सहकार विभागाकडे केली होती. (Aurangabad High Court) तत्कालीन चौकशी अधिकारी तथा उपनिबंधक डॉ. मुकेश बाराहाते यांनी सुमारे 150 पानांचा चौकशी अहवाल तयार केला.

त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने 25 मुद्यांवर निष्कर्ष नोंदवून राधाकिसन पठाडे यांनी केलेल्या बेकायदेशीर कामांची चौकशीअंती जबाबदार असल्याचे निष्कर्ष आपल्या 19 मार्च 2021 रोजीच्या चौकशी अहवालामध्ये काढले होते. त्यानंतर हा चौकशी अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने दोषीवर पुढील कारवाई व्हावी म्हणून ज्ञानेश्वर म्हस्के यांनी उच्च न्यायालयातही रिट याचिका दाखल केली होती.

abdul sattar
Abdul Sattar News : अब्दुल सत्तारांचे मेडिकल काॅलेज अडचणीत, खंडपीठात याचिका दाखल

त्यानुसार 10 एप्रिल 2023 रोजी उच्च न्यायालयाने पुढील कार्यवाही करण्याचे आदेशही दिले होते. असे असताना पठाडे यांनी मंत्री अब्दुल सत्त्तार (Abdul Sattar) यांच्याकडे अपिल दाखल केले. मंत्री अब्दुल सत्त्तार यांनी अपिलामध्ये अधिकार नसतांना चौकशी अहवालच रद्द करण्याचे आदेश दिले. सत्त्तार यांच्या आदेशाला तक्रारदार ज्ञानेश्वर म्हस्के यांनी पुन्हा आव्हान देणारी रिट याचिका अ‍ॅड. प्रसाद जरारे यांच्यामार्फत दाखल केली.

मंत्री अब्दुल सत्त्तार यांना कोणतेही अधिकार व त्यांचे कार्यक्षेत्र नसताना कायद्याच्या तरतुदीच्या विरोधात त्यांनी अपिलात बेकायदेशीर आदेश पारित करून चौकशी अहवाल रद्द केल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाने पारित केलेल्या 10 एप्रिल 2023 चे आदेश निदर्शनास आणुन दिल्यानंतर देखील सत्त्तार यांनी आदेश पारित केले, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला.

abdul sattar
Abdul Sattar Vs BJP : हा संघर्ष सत्तार नव्हे, शिंदे गट विरुद्ध भाजप! ; महायुतीत लागलेली ही आग कोण विझवणार?

सुनावणी दरम्यान सत्त्तार यांनी या अगोदर देखील अनेक प्रकरणामंध्ये अशाच प्रकारे बेकायदेशीर आदेश पारित केल्याचे व न्यायालयाने त्यांच्या कामकाजावर ताशेरे ओढल्याचे दाखले सुनावणी दरम्यान सादर करण्यात आले. याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ व्हि. डी. होन व अ‍ॅड. प्रसाद जरारे, सभापती पठाडे यांच्यातर्फे अ‍ॅड. एस. एस. ठोंबरे व शासनातर्फे अ‍ॅड. के. बी. जाधवर यांनी काम पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com