
Mumbai News : मंत्री संजय शिरसाट यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी देशमुख कुटुंबियांना महायुती सरकारच्यावतीने मोठं आश्वासन दिलं आहे.
"संतोष देशमुख यांच्यावर ज्यांनी वार केले आहेत, त्यांना सरकार फाशीच्या तख्तापर्यंत नेईल. त्याचा प्रत्यय तुम्हाला दोन-एक दिवसात येईल", असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले.
मंत्री संजय शिरसाट यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या घटनेत महायुती (Mahayuti) सरकारची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भूमिका नेमकी काय असणार आहे, यावर भाष्य करताना संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी कोणीही असू देत, त्यांना सरकार सोडणार नाही, असा इशारा दिला.
मंत्री संजय शिरसाट यांनी बीडचे पोलिस (Police) अधीक्षकांची देखील भेट घेतली. 'पाहिले काही करायचे असेल, तर अगोदर डिपार्टमेंट नीट करा. बाकी सोडून द्या. डिपार्टमेंटमधील माणूस त्यांना सहकार्य करणार असतील, तर हे खतरनाक आहे. यात पोलिस अधीक्षकांना मी काही नावं दिले असून, त्यावर 2 ते 4 दिवसात आरोपींना अटक होईल', असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
'पैशाची मस्ती अन् राजकीय तागदीचा वापर जो इथं झालाय तो अतिशय दुर्दैवी आहे. हा देशमुखांवर झालेला अन्याय नाही, तर यामुळं बाकीचे सरपंच देखील दहशतीत आहेत. बदलापूर प्रकरणात देखील सागितलं होतं की, अशा प्रवृत्तींना आपण दिवसाढवळ्या जरी मारलं, तर लोक पेढे वाटतील', याची आठवण करून देताना मंत्री संजय शिरसाट यांनी या घटनेबाबत सरकार किती गंभीर आहे, याचे संकेत दिले.
"बीडमध्ये कोणताही अधिकारी येत नाही. आम्हाला बीड सोडून कुठंही द्या, म्हणतात. आलेल्या अधिकाऱ्यांनी कसं राहायचं हे इथले पुढारी ठरवतात. या घटनेचे गांभीर्य किती आहे, याची माहिती तातडीने एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीससाहेबांना सांगणार आहे. ज्याने संतोषवर वार केलाय, त्याला फाशीच्या तख्तापर्यंत सरकार नेणार, सरकारची भूमिका आरोपीला अटक करण्याची आहे. त्याचा प्रत्यय दोन-तीन दिवसात येईल. जर आरोपीला अटक नाही झाली, तर आम्ही तुमच्या सोबत राहू", असे आश्वासन मंत्री संजय शिरसाट यांनी देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांना दिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.