Manoj Jarange On Shambhuraj Desai : मराठा आरक्षण मीडियात बोलून सुटणारा प्रश्न नाही; मनोज जरांगेंनी मंत्री देसाईंना फटकारलं

Shambhuraj Desai appeals to Manoj Jarange to present his stand on Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि मीडियाच्या माध्यमातून आपली मत मांडणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांवर मनोज जरांगे यांनी टिका केली.
Manoj Jarange On Shambhuraj Desai
Manoj Jarange On Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

दिलीप दखणे

Manoj Jarange News : मराठा आरक्षणाचा प्रश्न हा लहान नाही, मीडियावर बोलून तो सुटणार नाही. शंभुराज देसाई यांनी अंतरवालीत येऊन भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाचव्यांदा सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. उपचार घेण्यास नकार दिल्यामुळे जरांगे यांची तब्येत खालवली आहे. यामुळे मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये एकत्र जमू लागला आहे. ॉ

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि मीडियाच्या माध्यमातून आपली मत मांडणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांवर टिकास्त्र सोडले. 8 जून रोजी अंतरवालीत मनोज जरांगे यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण 13 जूनला मंत्री शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने महिनाभराची मुदत घेऊन स्थगित केले होते.

Manoj Jarange On Shambhuraj Desai
Manoj Jarange Patil : ठरलं मनोज जरांगेंचं पुढचं आंदोलन छगन भुजबळांच्या येवल्यात...

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या मीडियावरील विधानाचा दाखला देत मनोज जरांगे यांनी त्यांना अंतरवालीत समोर येऊन भूमिका स्पष्ट करा, असे आवाहन केले. त्यांनी तिकडून बोलायचे मी इकडून बोलायचे, इतका मराठा आरक्षण हा लहान विषय नाही. मीडियाव्दारे बोलून सुटणार हा विषय नाही, मंत्री शंभूराज देसाई यांनी येथे येऊन भूमिका स्पष्ट करावी. सापडलेल्या नोंदीच्या आधारे वेळेत प्रमाणपत्र द्यावे, तिन्ही गॅजेट लागू करावे, या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत.

Manoj Jarange On Shambhuraj Desai
Manoj Jarange Patil : कलगीतुरा रंगला! दरेकर हे तमाशातील नथ नसलेली मावशी, जरांगे-पाटलांचा हल्लाबोल

आरक्षणाचे प्रश्न सोडवल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला. माझ्यावर जे टिका करतात त्यांना उपोषण संपल्यावर उत्तर देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची आरक्षणाबाबत काय काय चर्चा झाली हे माहीत नाही. सरकारला वेळ दिला, मुदत दिली पण सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आता अंतरवाली सराटीत कोणता मंत्री पाठवावा, असा प्रश्न सरकारला पडला आहे, असा टोला जरांगे यांनी लगावला.

आमचे उपोषण सुरू आहे, सरकारला इकडे येऊन काय बोलावे, असा प्रश्न पडला आहे. सरकारने ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्या आधारे उशीर न करता त्यांना प्रमाणपत्र वाटप करावे. मराठा समाजाच्या विद्यार्थांना प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्रात अडचणी येत होत्या, याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारने सहा महिन्याची मुदतवाढ दिली. मी त्यांचे कौतुक करतो, सरकारने चांगला निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदे हे आरक्षण देऊ शकतात, त्यांनी लवकर आरक्षण द्यावे, आमचे हाल करू नये, असेही जरांगे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com