Tanaji Sawant Vs Omraje Nimbalkar: '..तर म्हणाल ती पैज हरायला तयार'; तानाजी सावंतांचं ओमराजे निंबाळकरांना आव्हान!

Loksabha Election : कोणी थापा मारत असेल तर त्याची जागा चौकात दाखवा, असंही म्हणाले आहेत.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

शितल वाघमारे-

Osmanabad Politics : 'आपण 2019 ते 2024 या कार्यकाळासाठी अपघातानं खासदार झालात. कोणालातरी फसवून खासदार झालात, मला धोका दिला. या माझ्या 18 लाख जनतेसाठी केंद्रातली आपण एक आणलेली योजना दाखवा. म्हणेल ती पैज हरायला तयार आहे.' असे आव्हान राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना दिलं आहे.

तसेच शिवसेनेकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड हेही धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक आहेत. परंतु गायकवाड यांना आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी या मेळाव्यात मिळाली नाही. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Tanaji Sawant
BJP News : आमचा वापर केवळ कढीपत्ता म्हणून..., महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य

धाराशिव येथे महायुतीचा रविवारी 14 जानेवारी रोजी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राजाभाऊ राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी खासदार रवींद्र गायकवाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता साळुंके, सुरज साळुंके, प्रहार चे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ, भाजपा नेते, सुधीर पाटील, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना तानाजी सावंत(Tanaji Sawant) म्हणाले की, अजून निवडणुकीला वेळ आहे. त्या वेळेस निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे त्या त्यावेळेस मिटवली पाहिजेत. एक योजना केंद्राची माझ्या या संपूर्ण गोरगरीब जनतेसाठी 18 लाख मतदारांचा संघासाठी मी आणली हे एक माझं व्हिजन होतं. केंद्रातल्या पाच योजना मी महाराष्ट्रातील माझ्या मतदारसंघांमध्ये आणल्या एवढं माझं चॅलेंज आहे.

आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर(Omraje Nimbalkar) यांचा माजी खासदार असा उल्लेख करीत म्हणाले की, केंद्रातली योजना माजी खासदाराने आणली का, अजूनही वेळ आहे. अजून काय ठेवलेले असेल तर घेऊन ये म्हणावं. आम्ही अजूनही पाठ थोपठतो, कोणी थापा मारत असेल तर त्याची जागा चौकात दाखवा.

Tanaji Sawant
Mahayuti Beed Rally : महायुतीचा बीडमध्ये कार्यकर्ता मेळावा अन् बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटोच नाही!

धाराशिव लोकसभेचा मागील लोकसभेचा खासदार एक लाख 28 हजार मतांनी निवडून आला होता. तर या वेळेचा खासदार अडीच ते तीन लाखाच्या लीडने निवडून येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महायुती सरकारच्या काळात धाराशिव जिल्हयाला हजारो कोटी रुपयाचा निधी मिळाला आहे. या निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. यासाठी विकासाचा रोड मॅप तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com