Latur News : 'शेती हा शेतकऱ्यांचा आत्मा आणि शेतरस्ते त्याच्या धमन्या' असल्याचे सांगून औसा मतदारसंघात जवळपास दीड हजार किलोमीटर लांबीचे शेतरस्ते तयार केले. शेत तेथे रस्ता हे अभियान राबवून भाजपचे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतरस्त्यांचा 'औसा पॅटर्न' राज्यात पोहचवला. आता हे अभियान अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळाला साकडे घातले आहे.
जमिनीची खरेदी विक्री करतांना त्या जमिनीला जाण्या-येण्यासाठी रस्ता असेल तरच त्या जमिनीचा दस्त करता, येईल अन्यथा तो करता येणार नाही, असा कायदा करण्याची मागणी पवार यांनी केली आहे. तसेच या कायद्याला लवकरच मूर्तस्वरूप येणार असल्याचा विश्वासही अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते बोलत होते. (Abhimanyu Pawar and Farmers issue)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अभिमन्यू पवार(Abhimanyu Pawar) म्हणाले, 'जर असा कायदा महाराष्ट्रात झाला तर ती मोठी उपलब्धी असेल. तसेच याचे श्रेय आमदार अभिमन्यू पवार आणि त्यांच्या औसा मतदारसंघाला द्यावे लागेल. एकही शेतकरी शेतरस्त्यापासून वंचित राहणार नाही. रस्त्याअभावी शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट थांबेल, असा विश्वासही पवार यांनी बोलून दाखविला. पावसाळ्यात शेतीला पक्के व हक्काचे रस्ते नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.'
याशिवाय 'अनेकांना वेळेत रासी करता येत नाहीत. निवडणुकीच्या अगोदर गावागावात लोकांच्या भेटी दरम्यान शेतीला ज्या प्रमाणे वीज, पाणी, मजूर गरजेचे आहेत त्याच पटीत शेतरस्ते सुद्धा गरजेचे आहेत. शेतकऱ्यांना जर चांगले दिवस आणायचे असतील तर त्यांच्या शेतीला रस्ते दिले पाहिजेत. शेतरस्त्यांची लोकचळवळ उभी करून विविध योजनांच्या माध्यमातून मतदार संघात दीड हजार किलोमीटर लांबीचे पक्के शेतरस्ते तयार केले. मात्र अजूनही बऱ्याच गावात रस्ते निर्माण करणे आवश्यक आहे.' असंही अभिमन्यू पवार म्हटले आहे.
याचबरोबर 'यासाठी मी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांशी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा केली आणि विनंती केली. जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करतांना त्या जमिनीला शेतरस्ता असेल तरच त्याचा दस्त करण्यात यावा, अन्यथा दस्त होऊ नये असा कायदा किंवा तसा अध्यादेश काढावा. याला सर्वांनी सहमती दर्शविली असून लवकरच, असा शासकीय अध्यादेश निघणार आहे.' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. असा कायदा जर महाराष्ट्र शासनाने केला तर शेतकऱ्यांचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या दृष्टीने हे एक महत्वपर्ण पाऊल ठरणार आहे. असंही ते म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.