Latur News : "लातुरात देशमुखांची गढी.." ; भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चेवर देशमुखांचे स्पष्टीकरण

Amit Deshmukh News : निलंगेकर एका कार्यक्रमात देशमुख बंधुंच्या भाजप प्रवेशाला थेट विरोध केला आहे.
 r Amit Deshmukh
r Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Amit Deshmukh News : विधानसभेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे मराठवाड्यातील दोन नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या विधानामुळे नवं वळण मिळालं आहे. या वक्तव्यामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (amit deshmukh latest news)

काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान अमित देशमुख, धीरज देशमुख (amit deshmukh) हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच वंचित बुहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यात आणखी भर टाकली होती. "आता काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिले नाही. लातूरकर आणि नांदेडकर कधीही फडणवीसांच्या मांडीवर बसतील," असे आंबेडकर म्हणाले होते. त्यानंतर अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

 r Amit Deshmukh
Prakash Ambedkar News : आंबेडकर म्हणाले, "माझ्याइतके शरद पवारांना कोणीच ओळखत नाही...

यावर खुद्द अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित देशमुखांनी भाजपमध्ये जाण्याचा चर्चेला पूर्णविराम दिला आहे. लातुरात देशमुखांची गढी सुरक्षित असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.

निलंगेकर एका कार्यक्रमात देशमुख बंधुंच्या भाजप प्रवेशाला थेट विरोध केला आहे. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी देशमुखांच्या पक्षांतर चर्चेलाच जाहीर विरोध केल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 r Amit Deshmukh
Prakash Ambedkar News : काँग्रेस-राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला, असं आंबेडकर का म्हणाले..

निलंगेकर म्हणाले, "लातूरचे प्रिन्स, राजकुमार असलेले आमदार अमित देशमुख कधीही जनतेचे प्रश्न घेऊन लोकांत गेले नाहीत. मात्र, आता त्यांना भाजपमध्ये यायचे आहे. तशी हवा त्यांनी निर्माण केली. देशमुखांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे, पण त्यांना भाजपमध्ये घेणार नाही. ते भाजपमध्ये आलेले कार्यकर्त्यांना आवडणार नाही,"

तर संभाजी पाटील निलंगेकरांसमोर ते कडवे आव्हान राहणार आहे. कारण पक्षांतर्गत स्पर्धा वाढू शकते. त्यात एक भाऊ लातूर शहर आणि एक भाऊ लातूर ग्रामीणमध्ये विजयी झालेला आहे. विलासराव देशमुखांचे सुपुत्र म्हणून इथली जनताही त्यांच्यावर प्रेम करते. येणाऱ्या काळात लातूर महापालिकेची निवडणूक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com