Mla Dhiraj Deshmukh News : आधीचीच मदत मिळाली नाही, त्यात शेतकऱ्यांपुढे नवे संकट..

Latur : अस्मानी संकटामुळे हतबल झालेल्या शेतकरी बांधवांना सरकारने भरीव आर्थिक मदत देवून दिलासा देणे आवश्यक आहे.
Mla Dhiraj Dehsmukh
Mla Dhiraj DehsmukhSarkarnama
Published on
Updated on

Affected Farmers : खरीप हातातून गेल्यानंतर रब्बीवर मोठी आशा होती. रात्र-रात्र जागून शेतकऱ्यांनी पिके वाढवली होती. पण, अवकाळी पावसासह गारपिट झाल्याने काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लातूर आणि रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आमदार धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

Mla Dhiraj Dehsmukh
Girish Mahajan News : भूमीपूत्र म्हणून मला तुमच्या दुःखाची जाणीव, सरकार काहीही कमी पडू देणार नाही..

गोगलगायींचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी, संततधार पाऊस झाल्याने आधी सोयाबीन व इतर पिके वाहून गेली. याबाबत सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप अनेक (Affected Farmers) शेतकऱ्यांना मिळाली नाही. पीकविमा भरपाई रक्कमही अनेकांपर्यंत पोचली नाही. (Latur) त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अशा स्थितीत अवकाळी पावसासह गारपिट झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले असल्याचे ते म्हणाले. देशमुख यांनी रेणापूर तालुक्यातील रामवाडी ख, मोहगाव त, तळणी मो, धवेली, कुंभारवाडी, सिंधगाव तसेच लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव, टाकळगाव, सारसा, वांजरखेडा येथे बांधावर जावून शेतकरी बांधवांची भेट घेतली.

झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. हे नुकसान प्रत्येकाचे मन हेलावून टाकणारे आहे. त्यामुळे या नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधून घेवून शेतकरी बांधवांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे त्यांनी आश्वस्त केले. अवकाळी पाऊस, गारपिट यामुळे लातूर आणि रेणापूर तालुक्यात जागोजागी काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना मोठा फटका बसला आहे. आंबा, द्राक्षे या फळांचा शेतात मोठ्या प्रमाणात सडा पडला आहे. झाडावरील फळालाही मार बसला आहे. टरबूज, खरबूज, ड्रॅगन फळांसह टोमॅटो, कोथिंबीर, इतर पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

पिकांबरोबरच पशुधनाचे, घरांवरील पत्र्यांचे, सोलार पॅनलचे, रस्त्यांचेही नुकसान झाले. त्यामुळे या अस्मानी संकटामुळे हतबल झालेल्या शेतकरी बांधवांना सरकारने भरीव आर्थिक मदत देवून दिलासा देणे आवश्यक आहे, असे देशमुख यांनी सांगितले. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. टाकळगाव शिवारात विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com