शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार मुंदडांचे एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन

शेतकऱ्यांना सरकारने (State Government) सरसकट मदत जाहीर करावी, अन्यथा अन्नत्याग आंदोलनाचा इशारा आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी दिला होता.
Namita Mundada
Namita MundadaSarkarnama
Published on
Updated on

अंबाजोगाई (जि. बीड) : गेल्या १५ दिवसांपासून ढगफुटीसह झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) बीड (Beed) जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये हजारो जनावरे मृत झाले आहेत. तसेच, जिल्ह्यातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना (Farmers) पीकविमा तातडीने देत, शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्यावी. या मागण्यांसाठी केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी सोमवारी (ता.४ ऑक्टोबर) अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले.

Namita Mundada
आम्ही बांधावर होतो, तेव्हा त्या अमेरिकेत होत्या : धनंजय यांची पंकजांवर टीका

यंदा बीड जिल्ह्यावर पावसाने कहर केला आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यातील चार महिन्यात २० लोकांचे बळी गेले असून तब्बल ४३७ जनावरेही ठार झाले. तब्बल ११ वेळा अतिवृष्टी झाल्याने ६१ महसूल मंडळात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सव्वापाच लाख हेक्टरांवरील सोयाबीन, कपाशी, ऊस पीकाचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका केज विधानसभा मतदार संघातील केज-अंबाजोगाई व बीड तालुक्याला बसल्याचे नमिता मुंदडा यांनी सांगितले.

Namita Mundada
फक्त गोड-गोड बोलून आणि धीर सोडू नका म्हणून भागणार नाही; मेटेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुसळधार पावसामुळे शेतातील माती खरडून गेली असून, परिसरातील शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. आम्ही मागील आठ दिवसांपासून मतदारसंघात पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत आहोत." मात्र, आता सरकारने जिल्ह्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करत, शेतकऱ्यांना २०२० व २०२१ चा पीक विमा द्यावा. तर, नुकसान भरपाईपोटी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी. या मागण्या आमदार मुंदडा यांनी केल्या आहे.

या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्यायच नसल्याचे मुंदडा म्हणाल्या. यामुळे त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार भाजप सोमवारी पदाधिकाऱ्यांसह अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, विजयकांत मुंडे, प्रवक्ते राम कुलकर्णी आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com