आमदार प्रज्ञा सातव यांची राजकारणातील पहिली कसोटी!

नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे.
Mla Pradnya Satav

Mla Pradnya Satav

Sarkarnama
Published on
Updated on

सेनगाव (जि. हिंगोली) : सेनगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला गुरुवार पासून सुरुवात झाली. काँग्रेसकडून (Congress) आमदार प्रज्ञा सातव यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. त्यामुळे पज्ञा सातव (pradnya satav) यांची राजकारणातील पहिलीच कसोटी असणार आहे. कारण राजीव सातव असेपर्यंत प्रज्ञा या थेट स्थानिक पातळीवरील निवडणुकांत सक्रिय नव्हत्या. मात्र, आमदार झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाची पहिल्यांदाच नगरपंचायत (Nagar Panchayat elections) निवडणुकीत कसोटी लागणार आहे.

काँग्रेसकडून सातव व भाजपच्या वतीने आमदार मूटकुळे व जिल्हाध्यक्ष रामराव वडकूते यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या वेळी शहरात रॅली काढून दोन्ही पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे आता प्रचाराला केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत.

<div class="paragraphs"><p>Mla Pradnya Satav</p></div>
राष्ट्रवादी अन् शिवसेना आमनेसामने; आदिती तटकरे म्हणतात...

बुधवारी ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान निवडणुका लांबणीवर जातात की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुनावणी सुरू झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, दुपारी दोन वाजता ओबीसींच्या जागावर खुल्या प्रवर्गातून निवडणुका घेण्यात याव्या, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्या मुळे आता नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली.

मूटकुळे व वडकूते यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक प्रभागातुन उमेदवारांना सोबत प्रचार रॅली काढण्यात आली. तर दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने सातव यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली. काँग्रेसच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरुन गावामध्ये वाजत गाजत शेकडा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र, अद्याप वरिष्ठ पातळीवरील कुठलाही लोकप्रतिनिधी आलेला नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांची रणनीती नेमकी काय असणार आहे. याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

<div class="paragraphs"><p>Mla Pradnya Satav</p></div>
अपक्ष उमेदवाराचा NCPत प्रवेश : पारनेरच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे

प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर

भाजप १२, शिवसेना १३, काँग्रेस १० राष्ट्रवादी १० मनसे १ व इतर ४ असे पन्नास उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या व्हाट्सअॅप व फेसबुकरून व्हिडीओ व बॅनरचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्या मुळे निवडणुकीमध्ये उमेदवार सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com